मांगला देवी-कुऱ्हेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३० लक्ष रुपये, मांगलादेवी येथे अंतर्गत सिमेंट रोड बांधकामासाठी १२ लक्ष रुपये, जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यासाठी आठ लक्ष ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. मांगला देवी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन आमदार संजय राठोड यांनी डिजिटल रूम, वाचनालय, अंगणवाडीची पाहणी केली. यानंतर धनज (माणिकवाडा) परिसरातील १२ कोटी ४३ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही आ. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये धनज- माणिकवाडा-धामक रस्त्याची सुधारणा करण्यासाठी १० कोटी ९३ लक्ष रुपये,
धनज येथे सिमेंट रोड व नालीचे बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रुपये, धनज येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यासाठी १४ लक्ष रुपये, जलशुद्धीकरण सयंत्रासाठी १२ लक्ष ४३ हजार रुपये, धनज येथे दलित वस्तीमध्ये सिमेंट रोड, बंदीस्त नाली, सौर पथदिवे, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १६ लक्ष रुपये देण्यात आले. या दोन्ही ठिकाणी आमदार संजय राठोड यांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदाताई पवार होत्या. पंचायत समिती सभापती मधुमतीताई चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव ढवळे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाले, शिवसेना शहर प्रमुख दीपक आडे, रामराव गोल्हर, महिला तालुका प्रमुख वैशालीताई मासाळ,
पंचायत समिती सदस्य मनिषाताई गोळे, पंचायत समिती सदस्य भीमराव खोब्रागडे, युवा सेना तालुका प्रमुख इंद्रजीत चव्हाण मांगला देवी येथील सरपंच रवीपाल गंधे, उपसरपंच, सदस्य तसेच धनज येथील सरपंच अंजली हूड व माणिकवाडा येथील सरपंच हेमा किशोर चरडे, उपसरपंच, सदस्य व सर्व शिवसेना पदाधिकारी, गावातील नागरिक उपस्थित होते.