महाराष्ट्र24। यवतमाळ: बाजार समितीचे संचालक सुनील डिवरेंची गोळी झाडून निर्घृण हत्या केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला लागले आहे. काल रास्तारोको आणि आज शिवसेना नेत्यांनी बैठक घेऊन मृतक सुनील डिवरेंना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वर धडक देऊन विविध मागण्याचे निवेदन दिले.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भांब राजा चे माजी सरपंच सुनील डिवरे हत्या प्रकरणातील उर्वरित तीन फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी व ह्या बाबत तपासात कोणतीही हयगय होऊ नये असे निर्देश तपास अधिकाऱ्यांना देण्यात यावेत.
हत्याकांड अतिशय नियोजन बद्ध पद्धतीने करण्यात आले असून ज्यांनी हे हत्याकांड केले ते फक्त मोहरे आहेत. अशी जिल्हा शिवसेनेची भावना आहे. त्यामुळे ह्या हत्याकांडात पडद्यामागून ज्यांनी भूमिका बजावली व हे हत्याकांड घडवून आणण्यासाठी मदत केली ते अधिक मोठे गुन्हेगार आहेत. प्रत्यक्ष हत्याकांड घडवून आणणारे गुन्हेगार हत्याकांड होणे आधी कुठे बसले होते?
ते कोणाच्या संपर्कात होते?ह्या हत्याकांडात मयत सुनील डिवरे ह्यांची रेकी नेमकी कोणी केली? त्यांचे ठावठिकाण्या विषयी व घरी एकटे परिवारासोबत आहेत. ह्याची माहिती कोणी दिली? ह्याची देखील चौकशी भ्रमणध्वनी नोंदी तपासून व प्रत्यक्ष चौकशीतून निष्पन्न करण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन आमदार संजय राठोड आणि शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.