महाराष्ट्र24 | यवतमाळ : तालुक्यातील भांब राजा येथील माजी सरपंच आणि यवतमाळ बाजार समितीचे संचालक सुनील नारायण डिवरे यांच्या घरात घुसून तीन अज्ञात युवकांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
सुनील डिवरे यांची हत्या जुन्या वादातून झाल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे सुनील यांचे लहान भाऊ अनिल यांचा वाढदिवस गुरुवारी होता. वाढदिवस साजरा केल्या नंतर सुनील हा घरात बसला असताना तीन युवकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे सुनील डिवरे वर कोणी जुन्या वादातून कोणी 'लाल' केलं अशी चर्चा सुरु आहे. या घटनेची रात्री उशिरा यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सुनील डिवरे यांच्या पत्नी तथा भांब राजा या गावाच्या सरपंच अनुप्रिया डिवरे यांनी तक्रार दिल्याची माहिती आहे.