Breaking

Post Top Ad

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

ठाणेदार पितांबर जाधव साहेबांना हे जमेल?

ठाणेदार पितांबर जाधव साहेबांना हे जमेल?

ठाणेदार पितांबर जाधव यांनी सुरुवातीला दमदार एण्ट्री करून प्रेमनगर काढलं होत तो क्षण

महाराष्ट्र24आर्णी : शहराला गेल्या कित्येक वर्षा पासून लागलेला कलंक ठाणेदार पदाची सूत्र हाती घेताच पितांबर जाधव यांनी अक्षरशः बुल्डोजर चालवून 'प्रेमनगर' एका झटक्यात साप केलं.त्यामुळे ठाणेदार जाधव यांच्या नाव आर्णीच्या इतिहासात कोरल्या गेलं.एवढंच काय तर ठाणेदार पितांबर जाधव यांची बदली करण्यात आली तेव्हा आर्णीकर स्वतःहून रस्त्यावर उतरून शहर बंद केले. आता पर्यंत ठाणेदारांच्या समर्थनात आर्णी शहर कधीही बंद करण्यात आले नव्हते.मात्र पितांबर जाधव साठी लाखो नागरिक एकवटले हा देखील एक इतिहासाचाच भाग म्हणावा लागेल.


नागरिकांचा आर्शीवाद ज्या अधिकाऱ्यांना मिळतो तो अधिकारी नक्कीच भाग्यवान असतो.मात्र आर्णीतील 'प्रेमनगर' हटवून पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व विषय सुटले का अशा प्रश्न कोणी जर विचारल तर त्याच उत्तर नाही असाच मिळेल. सध्या हजारो 'तरूण गावठी हातभट्टी दारूच्या व्यसनाच्या खाईत डूबले आहे'. अनेक जण तर दारूच्या व्यसनामुळे शेवटचं घटक मोजत आहे. 

ठाणेदार पितांबर जाधव साहेबांना हे जमेल?

गावातील अवैध हातभट्टी बंद करणे हे पोलीसांचे काम नाही, या साठी स्वत्रंत अन्न औषध प्रशासन विभाग काम पाहते.मात्र एक जागृत अधिकारी म्हणुन मोठ्या अशेनी नागरिक ठाणेदार पितांबर जाधव कडे बघताय त्यामुळे त्यांच्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील अवैध हातभट्टी बंद करण्याची धाडस त्यांनी दाखवल्यास हजारो नव्हे तर लाखो तरूणांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते.

ठाणेदार पितांबर जाधव साहेबांना हे जमेल?

ठाणेदार पितांबर जाधव यांनी ग्रामीण भागातील अवैध हातभट्टी दारू कायमस्वरुपी बंद केल्यास ज्या पध्दतीने आर्णी शहरातील प्रेमनगर कायमाचं बंद करून शहरात इतिहास घडवलाय त्याच प्रकारे ग्रामीण भागातील माता भगिनी ठाणेदार पितांबर जाधव यांना गळ्यातील ताईत बनवल्या शिवाय राहणार नाही. फक्त ठाणेदार जाधव यांनी हातभट्टी बंद करण्याची ईच्छा शक्ती दाखवण्याची गरज आहे. ठाणेदारांनी ग्रामीण भागाल अवैध हातभट्टी दारूचे अड्डे कायमस्वरुपी बंद केल्यास लाखो नागरिकांच्या मनात कायमाचं घर करून बसल्या शिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad