Breaking

Post Top Ad

रविवार, २३ जानेवारी, २०२२

यवतमाळ शिवसेनेचा अनोखा उपक्रम

यवतमाळ शिवसेनेचा अनोखा उपक्रम
यवतमाळ: वंदनीय हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पवित्र पर्वावर यवतमाळ जिल्ह्यात महायज्ञ आरोग्य सेवा शिबीरांचे विशाल प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री तथा आमदार संजय राठोड आणि शिवसेनाजिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्या संकल्पनेतुन हे शिबीर आकाराला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २०टक्के राज कारण हे ब्रिद वंदनिय बाळासाहेबांनी तमाम शिवसैनिकाच्या मेंदुवर कायमचे कोरुन ठेवले आहे. 


नेमका हाच धागा पकडुन, परागभाऊ पिंगळे  यांनी समाजातील शोषित पिडीत आणि समाजाच्या अंतिम टोकाच्या माणसाची सेवा करण्यासाठी झपाटले आहेत. डोक्यावर बर्फाचा खडा आणि तोंडात खडी साखर घेऊन फिरणारा एक अवलीया,  अजातशत्रू  म्हणुन पराग पिंगळे  जिल्हाभर ओळखले जाते. एरवी अडवा, बडवा,तुडवा अशी काहीशी शिवसेनेची स्टाईल राहीली आहे. मात्र याला पराग पिंगळे अपवाद ठरले आहेत. प्रेमाने असाध्य ते साध्य करता येते. असा दुर्दम्य आशावाद त्यांच्या मनोमनी अगदी ठासुन भरला आहे. दारिद्र्य, वाढती महागाई, निराधारता, भुक, न परवडणारे आजार इत्यादी व्याधी व्याधींनी उध्वस्त झालेल्या  गोर गरीबांबाबत त्यांच्या मनामध्ये अपार कळवळा आणि प्रचंड तळमळ आहे. 

यवतमाळ शिवसेनेचा अनोखा उपक्रम

नेमके हेच आमदार संजयभाऊ राठोड यांनी हेरले. अन् पराग भाऊंच्या कणखर आणि दणकट खांद्यावर भगवा शेला टाकुन संजय भाऊंनी पोलादी मनगटावर शिवबंधन बांधले. तेव्हा पासुनच ख-या अर्थाने पराग भाऊंचा सामाजिक आणि राजकीय आलेख गगणाला गवसनी घालत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन राजकारणाचा श्री गणेशा करणारे पराग भाऊ आता शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची सशक्त पणे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या मेंदुमधुन सामाजिक जाणिवेच्या विवीध संकल्पना वेळोवेळी जन्माला येत असतात. त्यापैकीच संकल्पना म्हणजे, महायज्ञ आरोग्य सेवा शिबीर होय. ३५ गाव ३५ शिबिर आयोजित करुन, तब्बल १० हजार रुगणांची नानाविध आरोग्य तपासणी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करुन मोफत औषधोपचार करण्याचा विडा पराग भाऊ पिंगळे यांनी ऊचलला आहे. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा आहे. 


हे ब्रम्ह वाक्य काळजावर कोरुन घेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना एक आगळी वेगळी आदरांजली वाहण्यात येत आहे. मायेची ममता, प्रेम, आणि प्रेरणा देणा-या पराग भाऊंनी सामाजीक ऊत्तरदाईत्वाची जाणीव ठेवून आरोग्य शिबीरांचे आयोजन केल्याने त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोप-यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातुनच ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शिवसेना आता घराघरांत पोहचली आहे. "जे का रंगले गांजले  त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा " या संत वचनातील खराखुरा देव गोर गरीब जनता पराग भाऊ पिंगळे यांच्यात पाहते आहे. त्यांच्या हातुन ऊतरोत्तर रुगणांची सेवा घडत आहे. हिच ख-या अर्थाने वंदनिय  बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली आहे. मधमाशी फुलांच्या सुंदरतेवर आकर्षित झालेली नसते, तर ती पाहते फुलांच्या अंतःकरणात, त्यात असणा-या मकरंदाकडे. तोच मकरंद आमदार संजय भाऊ राठोड यांनी पराग भाऊंमध्ये शोधला. त्याची मधाळता अवघा जिल्हा चाखतो आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad