वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक जागेचा ऊर्जा प्रवाहावर प्रभाव असतो. विशेषतः बेडरूममध्ये आरसा ठेवणे अपशकुन मानले जाते कारण त्याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो.
जर पलंगाचे प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर हे वैवाहिक जीवनात तणाव, वाद आणि मतभेद निर्माण करू शकते. म्हणूनच पलंगासमोर आरसा ठेवू नये.
तसेच, बेडरूमच्या दरवाज्याजवळ आरसा असेल तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परत जाते. यामुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक अस्थिरता वाढू शकते.
रात्री झोपताना आरशात स्वतःचं प्रतिबिंब दिसल्याने भ्रम आणि तणाव वाढतो, त्यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होते. म्हणून वास्तुशास्त्रात रात्री आरसा झाकून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
योग्य उपाय म्हणजे बेडरूममध्ये आरसा ठेवणं टाळा आणि तो इतर खोलीत ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मकता वाढते आणि दाम्पत्य जीवनात आनंद व स्थैर्य टिकून राहते.
[ संबंधित माहिती सर्वसाधारण मान्यता आणि टीप स्वरूपातील माहितीवर आधारित आहे ]
----------------------------------------------------------------------------------------------------
