नवीन वर्ष 2026 लवकरच सुरू होणार आहे. वर्ष 2025 अनेकांसाठी आर्थिक अडचणी आणि संघर्षाचं वर्ष ठरलं. आता नव्या वर्षात समृद्धी आणि स्थैर्य हवं असल्यास, वास्तुशास्त्रानुसार काही शुभ वस्तू वर्ष संपण्यापूर्वीच घरात आणणे अत्यंत लाभदायक ठरेल.
घरात श्रीयंत्र ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. हे श्रीलक्ष्मीचं प्रतीक असून धनसंपत्ती आणि भाग्य वाढवते. श्रीयंत्र घराच्या पूर्व दिशेला किंवा पूजाघरात ठेवावे. दररोज पूजन केल्यास लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
धातूचं कासव ठेवणंही अत्यंत शुभ आहे. कासव हे दीर्घायुष्य आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. ते घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास घरात शांतता, आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य वाढतं. विशेषतः पितळ किंवा क्रिस्टलचं कासव अत्यंत लाभदायक ठरते.
घरात बांबूचा रोप ठेवणं शुभ आणि समृद्धीचं प्रतीक आहे. हे रोप घरात धन, सौभाग्य आणि आनंद आणतं. लकी बॅम्बू ड्रॉइंग रूम किंवा ऑफिस टेबलवर ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचं नियमित पाणी बदलणं आणि काळजी घेणं गरजेचं आहे.
कामधेनु गाय ही सर्व देवी-देवतांचं निवासस्थान मानली जाते. घराच्या उत्तर दिशेला किंवा दुकानातील गल्ल्याजवळ कामधेनुची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आहे. हे केल्याने व्यापारात वाढ होते आणि लक्ष्मीची कृपा मिळते.
[ संबंधित माहिती उपलब्ध स्त्रोतांच्या आधारावर टीप म्हणून देण्यात आलेली सर्वसाधारण प्रचलित माहिती आहे ]
----------------------------------------------------------------------------------------------------------
