ऑस्टिन:अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्या पगार पॅकेजला (Elon Musk Pay Package) कंपनीच्या शेअरहोल्डर्सनी मोठ्या बहुमताने मंजुरी दिली आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तब्बल 75 टक्के शेअरहोल्डर्सनी या अभूतपूर्व 1 ट्रिलियन डॉलर्सच्या कराराच्या बाजूने मतदान केले. हा निर्णय घेतल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मस्क स्वतः स्टेजवर येऊन आनंदाने नाचले. या पगार पॅकेजनुसार मस्कला पुढील 10 वर्षांत टेस्लाच्या बाजारमूल्यात मोठी वाढ घडवून आणावी लागेल.
सध्या मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, परंतु हे पॅकेज त्यांना आणखी श्रीमंत बनवू शकते. जर त्यांनी केवळ बाजार मूल्य वाढवले नाही तर इतर आर्थिक आणि तांत्रिक उद्दिष्टे पूर्ण केली, तर त्यांना बक्षीस म्हणून लाखो डॉलर्स किमतीचे नवीन शेअर्स मिळतील. मात्र, इतक्या मोठ्या पगारावर टेस्लाच्या बोर्डाला टीकेचा सामना करावा लागत आहे. बोर्डाचा युक्तिवाद असा आहे की, जर हे पॅकेज मंजूर झाले नसते, तर मस्क कंपनी सोडण्याचा निर्णय घेऊ शकले असते, आणि टेस्ला त्यांना गमावू शकत नाही.
ऑस्टिनमध्ये झालेल्या या सभेत मस्क म्हणाले, “आपण ज्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत तो टेस्लाच्या भविष्यातील केवळ एक नवीन अध्याय नाही, तर एक संपूर्ण नवीन पुस्तक आहे.” त्यांनी पुढे विनोदी भाषेत सांगितले की, “इतर कंपन्यांच्या शेअरहोल्डर बैठका कंटाळवाण्या असतात, पण आमच्या बैठका स्फोटक असतात. हे बघा, हे आश्चर्यकारक आहे.”
या अभूतपूर्व पगार पॅकेजनंतर जगभरात चर्चा सुरू झाली आहे की मस्क या रकमेतून काय खरेदी करू शकतात. सैद्धांतिकदृष्ट्या, त्यांच्या या पॅकेजमधून एखाद्या देशापासून ते मंगळावर वसाहत उभारण्यापर्यंत सर्वकाही शक्य आहे. उदाहरणार्थ, सौदी अरेबिया आणि नेदरलँड्सचा GDP सुमारे 1.2 ट्रिलियन डॉलर्स आहे म्हणजे मस्क त्यांच्या पॅकेजमध्ये थोडी भर घालून हे देश खरेदी करण्याइतकी संपत्ती बाळगतात. अगदी स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्रायल यांसारख्या देशांनाही त्यांच्या पगाराच्या तुलनेत खरेदी करण्यासारखी क्षमता मस्ककडे आहे.
सध्या जगातील 19 देशांचा GDP 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे, तर उर्वरित 170 देशांचा GDP त्यापेक्षा कमी आहे. याचा अर्थ मस्ककडे 170 हून अधिक देश खरेदी करण्याइतकी संपत्ती आहे, हे विनोदी पण आश्चर्यचकित करणारे वास्तव आहे.
मंगळावर वसाहत उभारण्याच्या कल्पनेबद्दल मस्कने पूर्वी सांगितले होते की, सुमारे 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी किमान 10 ट्रिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. सध्या स्पेसएक्सद्वारे एक टन माल अवकाशात पाठवण्यासाठी सुमारे 2 लाख डॉलर्स खर्च येतो. जर हा खर्च अर्धा केला, तर मंगळावर शहर वसवण्यासाठी मस्कला त्यांच्या पगार पॅकेजच्या फक्त 10 टक्के निधीची आवश्यकता असेल. नासाच्या अंदाजानुसार, मंगळावर वसाहत उभारण्याचा खर्च 600 अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतो, म्हणजे मस्ककडे अजूनही प्रकल्प पूर्ण केल्यानंतर प्रचंड निधी उरेल.
तथापि, मंगळावर टिकाऊ शहर बांधण्याची प्रक्रिया तांत्रिक, पर्यावरणीय आणि मानवी दृष्टिकोनातून अत्यंत अवघड आहे. पण एलन मस्कच्या दृष्टीने काहीही अशक्य नाही, हे त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाने जगाला दाखवून दिले आहे.
______________________________________________________________________________
