२०२६ चे पहिले ग्रहण कधी? नव्या वर्षांत लागणार चार ग्रहण; दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा अंधकार


मुंबई : नवीन वर्ष २०२६ अजून काही आठवडे दूर असले तरी, खगोल अभ्यासक आणि ज्योतिषतज्ज्ञांच्या मते या वर्षात एकूण चार ग्रहणे लागणार आहेत. यामध्ये दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणांचा समावेश आहे. त्यामुळे वर्षभरात चारवेळा आकाशात अंधकार पसरलेला दिसणार आहे.

२०२६ चे पहिले ग्रहण १७ फेब्रुवारी (कंकणाकृती सूर्यग्रहण) साल २०२६ मधील पहिले ग्रहण १७ फेब्रुवारी २०२६ रोजी लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) असणार असून, या वेळी सूर्याभोवती अग्नीवृत्तासारखी तेजस्वी रिंग दिसणार आहे. भारतातून हे ग्रहण आंशिक स्वरूपात पाहाता येईल.

दुसरे ग्रहण  ३ मार्च (पूर्ण चंद्रग्रहण)

या वर्षातील दुसरे ग्रहण ३ मार्च २०२६ रोजी पूर्ण चंद्रग्रहण (Lunar Eclipse) स्वरूपात लागेल. हे ग्रहण भारतासह आशियातील अनेक भागातून रात्री स्पष्टपणे पाहाता येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणावेळी सूतककाळ पाळण्याचे सांगितले आहे.

तिसरे ग्रहण – १२ ऑगस्ट (सूर्यग्रहण)

२०२६ मधील तिसरे ग्रहण १२ ऑगस्ट २०२६ रोजी लागणार आहे. हे हरियाली अमावस्येच्या दिवशी लागणारे सूर्यग्रहण असल्याने विशेष मानले जात आहे. या ग्रहणाची सर्वाधिक छाया अमेरिका आणि युरोपात दिसणार असून, भारतातून हे सूर्यग्रहण फक्त आंशिक रूपात पाहता येईल.

चौथे ग्रहण – २८ ऑगस्ट (आंशिक चंद्रग्रहण) २०२६ चे शेवटचे ग्रहण २८ ऑगस्ट २०२६ रोजी लागणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) असेल. या वेळी चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येईल. भारतातून हे ग्रहण सुस्पष्टरीत्या पाहता येणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये कोणतेही ग्रहण नाही

सध्या सोशल मीडियावर जानेवारी महिन्यात ग्रहण लागणार असल्याची चर्चा होत आहे, मात्र पंचांगानुसार जानेवारी २०२६ मध्ये कोणतेही ग्रहण नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. खगोलीय गणनेनुसार त्या महिन्यात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येण्याची स्थिती तयार होत नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील पहिले ग्रहण हा संपूर्ण वर्षातील घटनांचा संकेत मानला जातो. फेब्रुवारीचे ग्रहण कुंभ राशीच्या सौर प्रभावात आणि सिंह-कुंभ अक्षावर घडणार आहे, ज्यामुळे सत्ता, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसेच मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराची पूजा करावी, असे ज्योतिषतज्ज्ञ सुचवतात.




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने