शुभ मुहूर्तांची घट, लग्नसराईच्या हंगामावर ग्रहांचे सावट!

लग्नसराई सुरू... पण ग्रहांची साथ नाही फक्त 49 मुहूर्तच!

मुंबई : दिवाळीचा उत्साह ओसरल्यानंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. घराघरांत लग्नसमारंभाची तयारी सुरू असून, लवकरच ढोल-ताशांच्या गजरात मंगलमय वातावरण दिसेल. मात्र, या वर्षी विवाहयोगासाठी ग्रह फारसे अनुकूल नसल्याचं ज्योतिषतज्ज्ञांचं मत आहे.

ज्योतिष अभ्यासकांच्या मते नोव्हेंबर 2025 ते जुलै 2026 या काळात लग्नासाठी केवळ 49 शुभमुहूर्त आहेत, तर मुंजीसाठी फक्त 20 मुहूर्त लाभणार आहेत. या मर्यादित मुहूर्तामागचं प्रमुख कारण म्हणजे गुरूचा अस्त आणि शुक्राचा अस्त हा कालावधी.

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू आणि शुक्र हे दोन्ही ग्रह विवाहासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. परंतु जेव्हा हे ग्रह अस्त म्हणजे क्षितिजाखाली असतात, तेव्हा त्या काळात विवाह किंवा धार्मिक विधी करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे यंदा विवाहयोगासाठी ग्रहयोग मर्यादित दिसत आहे.

 “गुरू अस्ताच्या काळात ज्ञान, कर्तव्य आणि कुटुंबसंस्था यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शक्ती दुर्बल होतात, तर शुक्र अस्ताच्या काळात प्रेम, सौंदर्य आणि वैवाहिक सौख्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे या काळात विवाह करणे टाळावे.”

दिवाळीनंतर लग्नसराईची तयारी सुरु असली तरी, ग्रहस्थितीचा विचार करूनच मुहूर्त निश्चित करणे आवश्यक मानले जाते.

2025-26 मधील विवाहाचे शुभमुहूर्त

नोव्हेंबर 25 - 22, 23, 25, 26, 27, 30

डिसेंबर 25 - 2, 5

फेब्रुवारी 26 - 6, 7, 10, 11, 12, 20, 21, 22, 25, 26

मार्च 26 - 5, 7, 8, 14, 15, 16

एप्रिल 26 - 21, 26, 28, 29, 30

मे 26 - 1, 3, 6, 8, 9, 10, 13, 14

जून 26 - 19, 23, 24, 27

जुलै 26 - 1, 3, 4, 7, 8, 11

मुंजीचे शुभमुहूर्त 2026:

फेब्रुवारी - 6, 19, 22, 26, 27

मार्च - 8, 20, 29

एप्रिल - 3, 8, 21, 22, 28

मे - 3, 6, 7, 8

जून - 16, 17, 19

या मर्यादित मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांना आपापल्या समारंभाच्या तारखा जुळवताना अडचण येण्याची शक्यता आहे. ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला आहे की, विवाह आणि मुंजीसारखे महत्त्वाचे संस्कार शुभ ग्रहस्थिती आणि योग्य मुहूर्तानुसारच करावेत.

(संबंधित माहिती आणि मुहूर्त हे सर्वसाधारण उपलब्ध माहितीच्या आधारावर देण्यात आलेले आहेत.)


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने