नोव्हेंबर महिन्यातही बँकांना 10 दिवस सुट्ट्या!
किती दिवस राहणार बंद? पाहा संपूर्ण यादी
मुंबई : सणासुदीचा हंगाम संपला असला तरी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा बँका सलग काही दिवस बंद राहणार आहेत. नोव्हेंबरमध्ये विविध धार्मिक आणि प्रादेशिक सणांमुळे बँकांना सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी व्यवहारांचे नियोजन आधीच करून ठेवणे गरजेचे आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) जारी केलेल्या अधिकृत यादीप्रमाणे, नोव्हेंबर 2025 मध्ये देशभरातील बँका अंदाजे ९ ते १० दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सुट्ट्यांबरोबरच काही स्थानिक आणि धार्मिक सणांचा समावेश आहे.
नोव्हेंबर महिन्यात गुरुनानक जयंती, दिवाळीचा, छठ पूजा, कन्नड राज्योत्सव आणि इतर सणांमुळे बँका काही ठिकाणी पूर्ण किंवा अंशतः बंद राहतील. याशिवाय, महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी व सर्व रविवारी नियमित सुट्ट्या असतील.
नोव्हेंबर 2025 मधील बँक सुट्ट्यांची यादी:
१ नोव्हेंबर – दिवाळी, हरियाणा दिवस, कन्नड राज्योत्सव, कुट
२ नोव्हेंबर – विक्रम संवत नवीन वर्ष, दिवाळी (बळी प्रतिपदा), गोवर्धन पूजा
३ नोव्हेंबर – निंगोल चक्कूबा, दिवाळी (सिक्कीम), भाई दूज
५ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा
७ नोव्हेंबर – छठ पूजा (आसाम, पश्चिम बंगाल), वांगळा उत्सव
८ नोव्हेंबर – छठ पूजा (बिहार), कनकदास जयंती
११ नोव्हेंबर – लहबाब डचेन
१२ नोव्हेंबर – इगास बागवाल
१५ नोव्हेंबर – गुरु नानक जयंती
२० नोव्हेंबर – गरिया पूजा
२३ नोव्हेंबर – संग कुट स्नेम
याशिवाय, प्रत्येक दुसरा (८ नोव्हेंबर) आणि चौथा शनिवार (२२ नोव्हेंबर) तसेच सर्व रविवारी बँका बंद राहतील.
आरबीआय दरवर्षी सर्व बँकांसाठी सुट्ट्यांची अधिकृत यादी जाहीर करते. या यादीत राष्ट्रीय, धार्मिक आणि प्रादेशिक सणांसोबतच शनिवार-रविवार सुट्ट्यांचाही समावेश असतो. त्यामुळे बँकिंग व्यवहारांपूर्वी ग्राहकांनी ही यादी तपासून घेणे हितावह ठरेल. तसेच प्रादेशिक सणांच्या सुट्ट्या सर्वत्रच लागू असतात असे नाही.
