निर्यातदारांनी माल चीनकडे वळवला, अमेरिकेला मोठा झटका

अमेरिकेचा 50% टेरिफ वर सांगून दे तिला भारताचा पलटवार 

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ (Tariff) लावण्याची घोषणा केल्यानंतर आता भारताने मोठे आर्थिक पाऊल उचलले आहे. या निर्णयानंतर अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावताना असा आरोप केला की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल (Crude Oil) विकत घेतो आणि त्या व्यवहारातून मिळणारा पैसा रशिया युक्रेनविरोधातील युद्धासाठी वापरतो. त्यामुळे अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.

या घोषणेनंतर भारतातील निर्यातदार (Exporters) चिंतेत पडले होते. कारण अमेरिकन बाजारपेठ ही भारतासाठी सर्वात मोठ्या निर्यात गंतव्यस्थानांपैकी एक आहे.

मात्र आता भारताने या टॅरिफला प्रभावी उत्तर दिले आहे. भारतातील अनेक निर्यातदारांनी आपला माल अमेरिकेऐवजी चीनच्या बाजारपेठांकडे वळवला आहे.

या पार्श्वभूमीवर चीनचे भारतातील राजदूत शू फीहोंग (Xu Feihong) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही चीनच्या बाजारपेठांमध्ये भारतीय वस्तूंचं स्वागत करतो. भारतावर अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही भारताची पूर्ण मदत करू.”

अमेरिकेच्या निर्णयानंतर भारताची चीनकडे निर्यात वेगाने वाढली आहे. 2025–26 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत भारताची चीनसोबतची निर्यात तब्बल २२ टक्क्यांनी वाढली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान भारताने चीनला 8.41 अब्ज डॉलर किमतीचा माल निर्यात केला. गेल्या वर्षी याच कालावधीत ही निर्यात 6.90 अब्ज डॉलर होती. म्हणजेच निर्यातीमध्ये २२% वाढ, तर अमेरिकेकडे निर्यातीत लक्षणीय घट झाली आहे.

विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये अमेरिकेने टॅरिफ लावल्यानंतर फक्त दोन महिन्यांत भारताची चीनकडे निर्यात ३४% ने वाढली आहे. ती 1.09 अब्ज डॉलरवरून थेट 1.47 अब्ज डॉलरपर्यंत पोचली.

भारतातून चीनकडे सर्वाधिक निर्यात खालील क्षेत्रांत झाली आहे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने वाढ 116% टेलिफोन सेट आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, समुद्री उत्पादनं (झिंगा इत्यादी) भारत-चीन व्यापाराचा हा वाढता कल अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाला थेट उत्तर म्हणून पाहिला जात आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने