अनिश्चित अर्थव्यवस्थेचा फटका 1.70 लाख नोकऱ्या धोक्यात
नवी दिल्ली : जगभरातील अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचं सावट पसरलं असून, त्याचा फटका थेट रोजगार क्षेत्रावर बसला आहे. अमेरिका आणि युरोपसह अनेक देशांतील मोठमोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कपात (Layoffs) करण्याची तयारी सुरू केली आहे. काही कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर वाढवून मानवी मनुष्यबळ कमी करत आहेत, तर काही कंपन्या खर्चकपातीच्या (Cost Cutting) धोरणाखाली हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.
या छंटनीच्या लाटेचा परिणाम थेट सुमारे 1.70 लाख कर्मचाऱ्यांवर होणार आहे. यात UPS, Amazon, Intel, Google, Meta, Microsoft, IBM यांसारख्या नामांकित जागतिक कंपन्यांचा समावेश आहे.
सर्वात मोठी कपात युनायटेड पार्सल सर्व्हिस (UPS) या अमेरिकन लॉजिस्टिक कंपनीने जाहीर केली आहे. कंपनीने तब्बल 48,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे कंपनीने कारण दिलं आहे “ऑटोमेशन आणि नवीन AI सिस्टीममुळे कार्यक्षमता वाढली आहे, त्यामुळे आता कमी कर्मचाऱ्यांत अधिक काम शक्य होणार आहे.”
दुसऱ्या क्रमांकावर Amazon ने देखील मोठा धक्का दिला आहे. जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या Amazon ने 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी सुरू केली आहे. AI आणि ऑटोमेशनमुळे अनेक विभागांमध्ये मानवी श्रमाची गरज कमी होत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
तिसऱ्या क्मांकावर Intel या टेक्नॉलॉजी दिग्गज कंपनीने तब्बल 24,000 कर्मचाऱ्यांची छंटनी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी चिप निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य असून, गेल्या काही महिन्यांपासून सेमीकंडक्टर क्षेत्रातील मंदी आणि मागणीतील घट यामुळे कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे खर्च नियंत्रणासाठी ही पावलं उचलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
टेक सेक्टरमध्ये हीच स्थिती अनेक ठिकाणी दिसतेय. Google, Meta, Microsoft, IBM, Salesforce, Dell या कंपन्यांनीही आपल्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची संख्येत कपात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बहुतांश कंपन्या सांगत आहेत की, AI आधारित तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेप कमी होत आहे, आणि कार्यक्षमतेसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जागतिक मंदीची छाया आणि तांत्रिक संक्रमण यांचा हा थेट परिणाम आहे. पुढील काही महिने अजून कठीण जाऊ शकतात, कारण अनेक उद्योग नव्या डिजिटल रचनेत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करत आहेत.
कर्मचार्यांसाठी ही परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. अचानक नोकरी गेल्यामुळे लाखो कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. तज्ज्ञांच्या मते, AI चा प्रसार आणि उत्पादकतेसाठी मानवी श्रमावर अवलंबित्व कमी होणं हे आगामी दशकातील मोठं आव्हान ठरणार आह
______________
