CBSE दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर;

 

 विद्यार्थ्यांकडे तयारीसाठी तब्बल 110 दिवसांचा कालावधी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अखेर 2026 च्या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in वरून विद्यार्थ्यांना विषयनिहाय (CBSE Datesheet 2026) वेळापत्रक पाहता आणि डाउनलोड करता येईल.

जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, सीबीएसई 10 वीची परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून 10 मार्च 2026 पर्यंत होणार आहे, तर 12 वीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत घेण्यात येईल. परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 1.30 पर्यंत दोन सत्रांत पार पडतील.

या परीक्षांमध्ये भारतासह जगभरातील 26 देशांमधील एकूण 45 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. एकूण 204 विषयांसाठी परीक्षा होणार असून प्रात्यक्षिक, मुल्यांकन आणि निकालाचे कामही बोर्डाच्या नियंत्रणाखाली पार पडणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेदेखील 2026 च्या फेब्रु-मार्च परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. 12 वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान तर 10 वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदा परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून विद्यार्थ्यांना अधिक तयारीचा कालावधी मिळणार आहे




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने