आधार, बँकिंग, क्रेडिट कार्ड नियमांमध्ये सुधारणा
नवी दिल्ली : १ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात पाच महत्त्वाचे नियमबदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर होईल. या बदलांमध्ये आधार अपडेट प्रक्रिया, बँकिंग नियम, नॉमिनी सिस्टम, एलपीजी किमती आणि क्रेडिट कार्ड शुल्क यांचा समावेश आहे.
UIDAI ने आधार कार्ड अपडेट प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. आता नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर यासारख्या माहितीचे अपडेट ऑनलाइन करता येणार असून नागरिकांना केंद्राला भेट देण्याची गरज राहणार नाही. मात्र, बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार केंद्रात उपस्थित राहणं आवश्यक राहील. UIDAI विविध सरकारी डेटाबेस (जसे रेशन कार्ड, मनरेगा, पॅन, पासपोर्ट) यांच्या आधारे पडताळणी करेल.
बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल होतील. ग्राहक आता त्यांच्या खात्यासाठी, लॉकरसाठी आणि सिक्युअर कस्टडीसाठी चार नॉमिनी ठरवू शकतील. प्रत्येक नॉमिनीला मिळणारी रक्कम ग्राहक स्वतः ठरवू शकतो.
एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अद्ययावत केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या महिन्यातही गॅसच्या किंमतीत वाढ किंवा घट होऊ शकते.
एसबीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी शुल्करचनेत बदल करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून असुरक्षित व्यवहारांवर ३.७५ टक्के शुल्क आकारले जाईल. शाळा किंवा महाविद्यालयीन शुल्क थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे भरल्यास १ टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, तर अधिकृत वेबसाइट किंवा पीओएस मशीनद्वारे पेमेंट केल्यास कोणतेही शुल्क लागणार नाही.
तसेच १००० रूपयांपेक्षा जास्त वॉलेट लोड करण्यासाठी १ टक्का शुल्क आणि कार्ड-टू-चेक पेमेंटसाठी २०० रूपये शुल्क आकारले जाणार
