शादाब जकातीला दुबईत मिळाला आलिशान फ्लॅट!
नवी दिल्ली : ‘10 रुपयांचे बिस्किट कितीचे आहे?’ — या एका वाक्याने इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या शादाब जकातीचं नशिब खरंच बदललं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या भारतीय क्रिएटरला आता दुबईमध्ये स्वतःचं ड्रीम होम मिळालं आहे. दुबईतील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जमजम ब्रदर्स यांनी त्यांना एक आलिशान फ्लॅट गिफ्ट केला आहे.
शादाब जकाती हा भारतातील एक सामान्य रीलमेकर होता. त्याचा एक छोटासा व्हिडिओ “10 रुपयाचं बिस्किट कितीचं आहे?” इतका व्हायरल झाला की तो रातोरात प्रसिद्ध झाला. या डायलॉगवर हजारो मीम्स तयार झाले, लोकांनी त्याच्या रील्सची कॉपी करून वेगवेगळे व्हर्जन बनवले. थोड्याच वेळात तो देश-विदेशात प्रसिद्ध झाला.
इंटरनेटवर शादाब जकातीची लोकप्रियता पाहून दुबईचे सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर @Zamzambrother यांनी त्याला दुबईत येण्याचं आमंत्रण दिलं. सध्या जकाती दुबईत जमजम इलेक्ट्रॉनिक्सच्या गेस्ट म्हणून थांबले आहेत. त्यांच्यासोबत अनेक विदेशी कंटेंट क्रिएटर्सनाही बोलावण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर जकाती आणि जमजम ब्रदर्सचे अनेक संयुक्त व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या भेटीत जमजम ब्रदर्सनी शादाबसाठी एक अविस्मरणीय सरप्राइज ठेवले होते
जमजम ब्रदर्सनी एका व्हिडिओमध्ये शादाबची डोळे बंद करून दुबईतील एक आलिशान फ्लॅट दाखवला आणि सांगितलं की, “हे घर आता तुझाच आहे.” हे ऐकून जकातीला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. त्याने विचारलं “तुम्ही मजाक तर करत नाही ना?”
त्यावर जमजम ब्रदर्स म्हणाले “नाही, हे खरं आहे. तू आमच्या लोकांना खूप आनंद आणि हसू दिलंस. हा फ्लॅट आता तुझाच आहे.” हे ऐकून शादाबच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तो भावूक झाला. त्याने दोघा भावांना मिठी मारत मनःपूर्वक आभार मानले.
हा दोन बेडरूमचा लग्झरियस फ्लॅट पाहून जकातीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हे हृदयस्पर्शी दृश्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
