Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ५ जानेवारी, २०२४

'अबकी बार मोहिनी नाईक खासदार'

'अबकी बार मोहिनी नाईक खासदार'

विद्यामान खासदार भावना गवळी आणि भावी खासदार मोहिनी नाईक एकाच मंचावर

महाराष्ट्र24 । पुसद,यवतमाळ : गेल्या कित्येक वर्षांपासून नाईक या तीन आक्षर: भोवती जिल्ह्याचं नव्हे तर राज्याचं राजकारण फिरतोय.वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने पुसद मतदारसंघाने दोन मुख्यमंत्री राज्याला दिले.आजही नाईक परिवारावर शेकडो नागरिक प्रेम करताय.त्यातच आता पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनिल नाईक ह्यांच्या पत्नी आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वांची मने जिंकणाऱ्या अॅड."मोहिनी नाईक' लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहेत.


मोहिनी नाईक ह्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उतरल्यास निवडून येण्याची शंभर टक्के गॅरेंटी असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मोहिनी नाईकांच्या हालचालींवर डोळा ठेवून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून नेमकं मोहिनी नाईक कोणत्या पक्षाकडून लढणार हे अद्यापही समोर आलेल नाही, परंतु मोहिनी नाईकांना उमेदवारी देण्यास भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आग्रहीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मोहिनी नाईक लोकसभेच्या रिंगणात उतरल्यास नवलवाटू नये.

मोहिनी नाईक कोण आहे?


मोहिनी नाईक हिच माहेर गुजरात मधील असून त्या राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनिल नाईक ह्यांच्या पत्नी आहेत.विशेष म्हणजे मोहिनी नाईक यांचे वडिल आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे दोघे जीवलग मित्र आहेत.त्यामुळे मोहिनी नाईक येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुक लढवतील आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाला प्रथमच कॅबिनेट मध्ये मंत्री पदाची लाॅटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण मोहिनी नाईक ह्या अभ्यासू व्यक्तीमत्व आहे.


'अबकी बार मोहिनी नाईक खासदार'
विद्यामान खासदार भावना गवळींवर नागरिकांची प्रचंड नाराजी आहेत.तर दूसरीकडे गवळींमागे ठाकरेंची ताकत नसणार त्यामुळे खासदार भावना गवळींना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा सुरू आहेत.त्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेना ठाकरे गट सक्षम उमदेवारांच्या शोधात आहेत.अॅड.मोहिनी नाईकांना उमेदवारी दिल्यास कोणत्याच पक्षाला टेंशन राहणार नाही,आणि निवडून येण्याची शंभर टक्के गॅरटी त्यामुळे 'अबकी बार मोहिनी नाईक खासदार अशी चर्चा सुरू आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad