महाराष्ट्र24 । यवतमाळ: पुसद येथे शुक्रवारी गोर सेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काळी दौलत येथील घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आला होता.दरम्यान एका दिवसा आधी पासूनच गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची पोलीसांनी धरपकड सुरू केली. त्यातच शहरात कोणालाही एन्ट्री पोलीसांनी दिली नाही.मग अचानक एकाचवेळी हजारो पदाधिकारी शहरात दाखल झाले कसे? कारण शहरात दहा ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना गोरसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शहरात दाखल झाल्याने मोठी चर्चा होत आहे.
'इंद्रनिल नाईक कपटी राजकारणी अजिबात नाही'
पुसद मध्ये जमावबंदी लागू केल्या नंतर ही मोठ्या संख्येने गोरसेनेचे पदाधिकारी शहरात दाखल झाले. वसंतराव नाईक चौकात गोरसेनेची सभा सुरू असताना समाजाच्या नागरिकांच्या भावनेचा आदर करण्याच्या दृष्टीने आमदार इंद्रनिल नाईक स्वतःहून ते सभास्थळी गेले.मात्र गोरसेनेच्या गर्दी सामिल झालेले भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार इंद्रनिल नाईकांना पाहूण एकच गदारोळ घातला त्यामुळे नाईक स्वतःहून परत गेले.मात्र त्यानंतर समाजतून तीव्र रोष व्यक्त होताना दिसत आहे.
काळी दौलत येथील श्याम राठोड या युवकचा निर्घुन खून केल्याची घटना दि.३ डिसेंबर ला घडली. आमदार इंद्रनिल नाईक यांनी जाळपोळ सुरू असताना त्या ठिकाणी भेट देऊन शांततेचे आवाहन करित मृतकांच्या कुटूंबियांची भेट घेत सांत्वन केले.मात्र पुसद मध्ये गोर सेनेच्या मोर्चात काही भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार इंद्रनिल नाईक यांच्या विरोधात घोषणा बाजी केली. त्यामुळे शहरात आपल्या मुळे कुठेही गालबोट लागू नये म्हणुन आमदार इंद्रनिल नाईक यांनी स्वतःहून सभास्थळावरून काढता पाय घेतला.
आमदार निलय नाईक त्या दिवशी गायब झाले?
आमदार निलय नाईक हे भाजपच्या कोट्यातून आमदारकी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि स्व.सुधाकरराव नाईक यांच्या विचाराचा विसर आमदार निलय नाईकांना पडल्याची चर्चा बंजारा समाजात होत आहे. आमदार निलय नाईक गोरसेनेने पुसद येथे काढलेल्या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याऐवजी ते बाहेर गावी गेल्याची चर्चा आहे.त्यामुळे आमदार निलय नाईकांना बंजारा समाजाच्या लोकांसोबत काही देणे घेणे नाही अशीच प्रतिक्रीया समाज माध्यमासह बंजारा समाजात उमटत आहे. आमदार इंद्रनिल नाईकांना कोणी बोलावले नसताना ते स्वतःहून गोरसेनेच्या सभास्थळी आले. त्यांना विरोध करण्यात आला हा भाग वेगळा मात्र विरोध करणारे कोण तर ते भाजपचे पदाधिकारी? अशी चर्चा होत आहे.
पुसद ही भूमी हरित क्रांतीचे जनक कै.वसंतराव नाईक आणि जल क्रांतीचे जनक स्व.सुधाकरराव नाईक यांची भूमी आणि त्यांचा वारसा पुढे नेणारे आमदार इंद्रनिल नाईक हे पुसद मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करताय. गोरसेनेच्या पाठीवर बंदूक ठेवून बरोबर आमदार इंद्रनिल नाईक यांचा गेम करण्यात भाजप यशस्वी झाली.मात्र त्या नंतर जनसामान्यात भाजप विरोधात चुकीचा मेसेज गेल्याने येणाऱ्या दिवसात त्याची किंमत भाजपाला मोजावी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.