'पारवा ठाणेदारांची 'विजय'च्या पाठीवर कौतुकाची थाप'

'पारवा ठाणेदारांची 'विजय'च्या पाठीवर कौतुकाची थाप'

महाराष्ट्र24 यवतमाळ: एरवी अंबर दिव्याचं पोलीसाच वाहन पारधी बेड्यावर चोरी, मारामारी शिकार, अशा अनेक प्रकारांनी पारधी बेड्यावर यायचं. मात्र घाटंजी तालुक्यातील रघुनगर- घोटी येथे पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण याचे वाहन पारधी बेड्यावर धडकताच पारधी समाजातील सर्वांच्या नजरा पोलिसांच्या गाडी कडे चोर नजरेने पाहू लागल्या.काय झाले काही नाही,याचा पारधी समाजातील नागरिक विचार करत असताना ठाणेदारांनी गाडीच्या खाली उतरून रामदेव बाबांच्या सहवासात लाभलेल्या विजय राठोड यांचे घर कुठे आहे. असे विचारून विजय च्या घरांकडे कुच केली.


कर्तव्यदक्ष ठाणेदार चव्हाण पोहचले पारधी बेड्यावर 

महाराष्ट्र24 ने दि.११ डिसेंबर रोजी विजय राठोड संदर्भात नुकताच बातमी अपलोड केली. त्यांची दखल घेत पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी विजय या तरूणांच्या घरी भेट देऊन कौतुक करित विजय चा उत्साह वाढविला.खर तर पोलीस अधिकरी म्हणजे ऑन चोविस तास नोकरी त्यात ही ठाणेदार विनोद चव्हाण सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी जोपासून समाजात वेगळा संदेश देताय. अल्पावधी काळात ठाणेदार विनोद चव्हाण यांनी धडाकेबाज कारवाई करून सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.


'पारवा ठाणेदारांची 'विजय'च्या पाठीवर कौतुकाची थाप'

गत पंधरवड्यात लोक वर्गणी करून एका कपड्यावर चक्क हरिद्वार गाठून रामदेव बाबांच्या योग शिबीरात विजय पोहचला होता.एका पारंगत योग गुरूलाही लाजविणारे कठीणात कठीण असणे सहजपणे करून योग गुरू रामदेव बाबांचे लक्ष वेधले होते.याची दखल घेत रामदेवबाबांनी विजय ला मंचावर पाचारण केले होते.तेव्हा विजय ला अवघ्या माध्यमांनी डोक्यावर घेतले.त्यामुळे अपसुकत यवतमाळ जिल्हाचे नाव जगाच्या नकाशावर कोरल्या गेले.याची जाणिव जागृत होऊन पारवा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी विजय च्या झोपडीला भेट देऊन विजय च्या पाठीवर कौतुकाची थाप मारून विजय राठोड या तरुणांचा शाळ श्रीफळ देऊन सत्कार करून कौतूक केले.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने