महाराष्ट्र24 । यवतमाळ आर्णी तालुक्यातील डेहणी येथील एका ४५ वर्षाच्या महिलेवर दुपारी साडे बारा वाजता दरम्यान तालुक्यातील डेहणी शेतशिवारात बलात्कार करून सदर घटनेचा आरोपींनी आश्लिल व्हिडीओ बनवून समाज माध्यमावर व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती पिडीत महिलेने पोलीसात दिलेल्या फिर्यादीतून पुढे आली.
दरम्यान या गंभीर घटनेची फिर्याद पिडीत महिलेने आज दि.२५ मे. रोजी आर्णी पोलीस स्टेशनला दिली.त्यावरून पोलीसांनी तीन आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी पिडीत महीला हि दि.६ मे. रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान डेहणी शेतशिवारातील एका शेतातुन जात असताना आरोपी अमोल प्रल्हाद आठवले (वय ३९) याने फिर्यादीवर वाईट उद्देशाने पाठलाग करुन फिर्यादीस मागुन पकडून खाली पाडले व फिर्यादीवर बलात्कार केला.
आरोपी आकीब खाॅ वाजीद खाॅ व शेख आकीब उर्फ मोनु शेख ईस्लामुद्दीन यांनी दि.२४ मे.रोजी सदर व्हिडिओ व्हायरल केला. अशी फिर्याद पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुनद केले असून तिघां विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून यात अमोल प्रल्हाद आठवले याला पोलीसांनी अटक केले आहे.सदर घटनेचा तपास ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करित आहे.
महिलेवर आरोपी बलात्कार करीत असताना घटनास्थळी हजर असलेले आरोपी नामे आकीब खाॅ वाजीद खाॅ व शेख आकीब उर्फ मोनु शेख ईस्लामुद्दीन यांनी अश्लील व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये काढला.सदर व्हिडिओ शेख आकीब उर्फ मोनु शेख ईस्लामुद्दीन यांनी फिर्यादी ला तिचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी वर बलात्कार केला व कोणाला काही सांगीतले तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
