Breaking

Post Top Ad

बुधवार, २६ मे, २०२१

'समाजकार्यातून आदिशक्तीचा गौरव वाढविणाऱ्या ऐश्वरी राठोड'

'समाजकार्यातून आदिशक्तीचा गौरव वाढविणाऱ्या ऐश्वरी राठोड'
महाराष्ट्र२४ जळगांव: महिलांनी फक्त चूल आणि मूल यामध्ये न अडकता आपल्या आवडीच्या किंवा कुटूंबामध्ये चालत असलेल्या व्यवसायामध्ये लक्ष देऊन त्यात सहभाग नोंदवावा. त्याच्या माध्यमातून प्रपंचाबरोबर समाजाची सेवा करावी. ज्या प्रमाणे सर्व नद्या समुद्रालाच जाऊन भेटतात, त्याचप्रमाणे कोणतेही काम करतांना प्रामाणिकपणे केले तर ती समाजसेवाच होते. डाॅ. ऐश्वरी राठोड यांनीही 'ज्याचा प्रपंच उत्तम, त्याचाच परमार्थ उत्तम' हे सूत्र लक्षात ठेवून जीवानाची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.

'समाजकार्यातून आदिशक्तीचा गौरव वाढविणाऱ्या ऐश्वरी राठोड'

जळगांव जिल्ह्यातील जामनेर येथे डाॅ. ऐश्वरी राठोड यांचा स्वतःचा रुग्णालय आहेत. रुग्णांची सेवा करून उर्वरित वेळ ऐश्वरी एस.राठोड फाऊंडेशन च्या माध्यमातून महिलांच्या आणि समाजाच्या प्रश्नाकरिता डाॅ. ऐश्वरी राठोड कायम संघर्ष करतात. यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षात शेतकरी,शेतमजुर, कष्टकरी आणि पिडीत नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी डाॅ. ऐश्वरी राठोड राठोड नेहमी आदिशक्तीचा अवतार दाखवित न्याय मिळवून दिला. मात्र राष्ट्रवादी मधील काही आगलावे नेते मंडळी जळून खाक झाल्याने डाॅ. ऐश्वरी राठोड यांनी राष्ट्रवादी पक्षाचा काम बाजुला करून बंजारा समाजातील पिडीत व वंचित महिला- नागरिकांसाठी लढा उभारला त्यामुळे डाॅ.ऐश्वरी राठोड यांनी जिल्ह्याभरात मोठी पकड निर्माण केली आहे.

'समाजकार्यातून आदिशक्तीचा गौरव वाढविणाऱ्या ऐश्वरी राठोड'

डॉ. ऐश्वरी राठोड नागरिकांच्या समस्या जाणून घेताना.

सध्या डाॅ.ऐश्वरी राठोड ह्या गोरबंजारा महिला बिग्रेडर च्या प्रदेशाध्यक्षा पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडत आहे. सामाजिक कार्यात डाॅ. ऐश्वरी राठोड यांचा वाट सिंहाचा आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्हा सह राज्यात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैधकिय क्षेत्रात काम करतांना 'रूग्ण सेवा, हिच मानव सेवा' समजून गोर गरिब रूग्णांचा आरोग्य देखील ते जपताय. डाॅ.ऐश्वरी राठोड यांच्या सारख्या लढावू आणि अभ्यासू महिलांना राजकारणात संधी मिळाल्यास त्या नक्कीच संधीचे सोनं केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सुद्धा डाॅ.ऐश्वरी राठोड यांनी हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad