महाराष्ट्र२४ | यवतमाळ: वीज वितरण कंपणी कामगार सह अभियंता संघटना संयुक्त कृती समिती कडून विविध मागण्यासाठी करिता काम बंद आंदोलन सुरू केल्याने विघुत पुरवठा खंडीत झाल्यास अंधाऱ्यात राहण्याची वेळ येऊ शकते.
कोरोना संकटात देखील वीज वितरण क्षेत्रातील कर्मचारी,कामगार यांनी मोठी कसरत करून विघुत पुरवठा खंडीत होऊ दिला नाही. कामगार आणि अभियंता यांना कोरोना संकटात फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची गरज आहे. वीज वितरण क्षेत्रातील कामगार,कर्मचारी आणि.अभियंता हे सेवा देण्यासाठी कोणतीही जीवाची परवा न करता रात्र न दिवस काम करतात.
कामगार आणि अभियंता कृती समितीच्या वतीने दि.२४ मे सोमवारी पाहून विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र विघुत सेवा सुरू राहील अशी ग्वाही खुद वीज वितरण च्या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.