Breaking

Post Top Ad

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

यवतमाळ आरोग्य विभागात अॅटीजन किट मध्ये घोळ

यवतमाळ आरोग्य विभागात अॅटीजन किट मध्ये घोळ

अँटीजन किटची सांख्य आणि संकेत स्थळावरच्या आकडेवारीत तफावत

जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे सादर केला अहवाल

यवतमाळ: जिल्हा हा अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट संदर्भात प्रसिद्ध आहे असे असतानाही सर्वात महत्त्वपूर्ण जबाबदारी आरोग्य विभागावर आहे.असे असताना जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्याबाबतचे कुठलीही हयगय करू नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश शासनाचे असतानाही यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने केंद्रीय संकेतस्थळावरील आकडेवारी आणि प्रत्यक्ष खरेदी खर्च यामधील तफावत निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याने अखेर आयुक्तांकडे जिल्हाधिकारी यांनी अहवाल पाठवल्याने खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी तफावत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिसून येत असून यांना प्राप्त कीट ८३ हजार १४९ आहेत. त्यापैकी ७० हजार ३३ किटचा वापर करण्यात आला शिल्लक किट १३ हजार ११६ तर आयसीएमआर पोर्टलवर फक्त ३५ हजार ४४२ इतकी संख्या दाखविण्यात आली असल्याने यवतमाळचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी आयुक्त कडे संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करून विभागीय आयुक्त यांना अहवाल सादर केल्याची माहिती आहे.

आयुक्त यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई दि .१३ मार्च २०२० च्या अधिसूचनान्वये राज्यात विषाणुमुळे ( कोविड-१९ ) उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. व सदर विषाणुमुळे उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे राज्यात साथरोग अधिनियम, १८९७ मधील खंड २,३ व ४ ची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. 


जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे ( कोविड - १९ ) होणाऱ्या प्रादुर्भावास किंवा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या कडून जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यात मागील काळात वाढती रुग्णसंख्या, रुग्णांचे तात्काळ निदान होवून उपचार करण्याकरीता Antigen Kit व्दारे चाचणी करण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली. 

बाकीच्या किट गेल्या कुठे?

अॅटीजन किट च्या आकडेवारीत मोठी तफावत झाली असून उर्वरित ७६ हजार किटा गेल्या कुठे? त्या संदर्भात केंद्रिय संकेतस्थळावर माहिती का दाखविण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न साहजिकच उपस्थितीत होतं आहे.कोरोना सारख्या संकटात अशा गंभीर प्रकार घडत असेल तर नक्कीच यांची सखोल चौकाशी होण्याची गरज आहे.


कोविड रूग्णांचे तात्काळ निदान करण्याकरीता विविध स्त्रोतांकडुन व शासनाच्या प्राप्त निधीतून खालील विवरणात दर्शविल्याप्रमाणे Rapid Antigen Kit उपलब्ध खरेदी करण्यात आली. परंतु आयसीएमआर पोर्टल(संकेतस्थळावर) दिसणारी संख्येत मोठी तफावत असल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी सिंह यांनी तात्काळ विभागीय आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करून संबंधित तफावती बाबतचा अहवाल सादर करण्याबाबतचे उचित मार्गदर्शन मागितले असून जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यामुळे या गंभीर प्रकारावर विभागीय आयुक्त कोणत्या चौकाशीचे आदेश देतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad