Breaking

Post Top Ad

सोमवार, १ मार्च, २०२१

बंजारा विरूद्ध भाजप:संजय राठोडांचा राजीनामा

बंजारा विरूद्ध भाजप:संजय राठोडांचा राजीनामा


महाराष्ट्र24 | टिम राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या वर आरोप झाल्या नंतर तब्बल २० दिवसा नंतर त्यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी रविवारला राजीनामा दिल्या नंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले.विशेष म्हणजे राजीनाम्याची वार्ता हव्या सारखी पसरल्याने बंजारा समाजात सन्नाटा पसरला. सोशल मिडीया वर भारतीय जनता पार्टीला या पुढे मी मतदान करणार नसल्याचे शेकडो युवकांनी जगजाहीर पोस्ट केल्या त्यामुळे येणाऱ्या काळात बंजारा विरूद्ध भाजप अशाच सामना पाहायला मिळणार आहे.

'मुख्यमंत्र्यांना मन हेलावून टाकणारे पत्र' 

बंजारा विरूद्ध भाजप:संजय राठोडांचा राजीनामा

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्या नंतर मुख्यमंत्री ठाकरे यांची मृतक पुजा हिच्या आई वडिलांनी भेट घेतली.दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मन हेलावून टाकणारे पत्र दिले.या पत्रात लिहिले आहे की,आपल्या पोटाचा गोळ्याचा मृत्यू हा कोणत्याही माता-पित्यासाठी वेदनादायी असतो.आमच्या मुलीचा बळी गेला पण मृत्यूच्या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा बळी जात आहे.याचे राजकारण करून वनमंत्री संजय राठोड यांचा बळी घेऊ नका असे मन हेलावून टाकणारे पत्र लहूचंद चव्हाण,आई मंदोदरी आणि बहिण देवयानी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

भाजप नेत्यांनी ऑडीओ क्लिपच्या आधारावर सुरूवाती पासून संजय राठोड यांच्या वर अगदी खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडं आरोप केले.त्यामुळे मृतक मुलीची आणि समाजाची यात नाहक बदनामी झाली.ज्या ऑडिओ क्लिपच्या आधारावर संजय राठोड यांच्या वर आरोप झाले ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही,कारण आपल्या राज्य घटनेत ऑडिओ क्लिपमधील आवाजाची शहानिशा करणारी 'स्पेक्टोग्राफी टेस्ट' अद्यापही विकसित झालेली नाही त्यामुळे ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचा आहे हे सिद्ध कसे होणार?.

'संजय राठोड यांना मिळतेय सहानुभूती' 

राजीनामा दिल्या नंतर काही वेळातच मृतच पुजा चव्हाण हिच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन मन हेलावून टाकणारे पत्र दिले.संजय राठोड यांच्या वर आमचा कोणताही आरोप नसून आमच्या मुलीच्या मृत्यूला ते जवाबदार नसून त्यांच्या विरोधात आमची कोणतीही तक्रार नाही,असे स्पष्ट लेखी स्वरुपात पत्र दिल्या नंतर अनेकांना धक्का बसला आहे.आश्चर्य ची बाब अशी की, आई-वडिलांना जर मुलीच्या मृत्यू पेक्षा संजय राठोड यांच्या पदाची काळजी असेल तर राज्यात बंजारा समाजातून किती मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत असेल याचा भाजपने विचार न केलेलाच बरा. भाजपने आरोप केल्या नंतर बंजारा समाजात प्रथमच समाज बांधवात एकजूट झाल्याचे बोलल्या जात आहे.

नि:पक्षपणे चौकाशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावा यासाठी रविवारी संजय राठोड यांनी आपला वनमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे दिला.पदावर असताना चौकाशी झाली असती तर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले असते.मात्र समाजाची बदनामी होऊ नये त्यासाठी राठोड यांनी राजीनामा दिला.एकंदरीत या सर्व प्रकरणा मध्ये भाजपने अतिशय घाणेरडं राजकारण केल्याची चर्चा बंजारा समाजात होत आहे.

विदर्भातील सेनेचा वाघ संपला?

विदर्भातील शिवसेनेचा वाघ म्हणुन संजय राठोड कडे पाहिल्या जाते.शिवसेनेच्या एका उमद्या नेत्याला मंत्रीपद गमवावे लागल्याची चर्चा होत आहे.

भावना गवळींची होतेय चर्चा?

संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील गटबाजी उघड आहे.त्यामुळे खासदार गवळींनी संजय राठोड यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने 'भाजप'ला साथ देऊन शिवसेनेच्या वरिष्ठांकडे राजीनामा करिता दाबाव आणल्याची चर्चा असून राजीनाम्या नंतर मात्र खासदार भावना गवळी विरोधात समाजातून नकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहे.त्यामुळे भविष्यात गवळींना बंजारा समाजाचे मतदान होतील की,नाही अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad