जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६५ वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या १४० जणांमध्ये पुरुष ८७ आणि महिला ५३ आहेत. यात यवतमाळ ४५ रुग्ण, पुसद ३२, दारव्हा १९, बाभुळगाव १४, महागाव ८, पांढरकवडा ६, वणी ५, दिग्रस ३, घाटंजी ३, कळंब २, उमरखेड २ आणि इतर ठिकाणचा १ रुग्ण आहे.
गुरूवारी एकूण १३७१ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १४० जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर १२३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३४३ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १६८५६ झाली आहे. चोवीस तासात ९० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५०५९ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४५४ मृत्युची नोंद आहे.
