आज देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले बजेटने देशवासीयांची व खास करून युवकांची घोर निराशा केली आहे. 'कोरोना' या जागतिक संकटामुळे देशात लावलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक लहान व्यवसाय बंद पडले आहेत.
तसेच अनेक तरुणांनी नोकऱ्या
गमावल्या आहेत.व्यवसाय पुन्हा उभारण्यासाठी व भांडवल उभे करण्यासाठी मोठी व
दिशादर्शक तरतूद होईल अशी अपेक्षा ह्या बजेटकडून होती.
त्याचप्रमाणे देशातील तरुणांना रोजगार निर्मिती साठी अनुकूल वातावरण देण्यासाठी व त्या अनुषंगाने वित्तीय उपाययोजना करण्यासाठी हे बजेट पूर्णतः अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी दिली आहे. खास करून युवकांना नुकताच सादर केलेल्या बजेट मध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना हा बजेट स्पेशल वांझोट ठरल्याची टिका शिवसेने कडून करण्यात आली आहे.