Breaking

Post Top Ad

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट

जिल्ह्यात कोरोनाचा ब्लास्ट
यवतमाळ: सोमवारी गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकाचा मृत्युसह २१० जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या १०७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


सोमवारी एकूण  १११३ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २१० जण नव्याने पॉझिटीव्हआले तर ९०३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०५२ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १६२५५ झाली आहे. 

 

आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील  ८७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या २१० जणांमध्ये पुरुष १२९ आणि महिला ८१ आहेत. यात यवतमाळातील ११४ रुग्ण, पुसद येथील ४१, पांढरकवडा ३३, दारव्हा १७, वणी ३, राळेगाव १ आणि झरीजामणी येथील १ रुग्ण आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad