Breaking

Post Top Ad

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

माझा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न: वनमंत्री संजय राठोड

माझा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न: वनमंत्री संजय राठोड
पोहरादेवी(वाशिम) गेल्या पंधरा दिवसा पासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी माझा आणि समाजाची बदनामी करण्याचा घाणेरडं राजकारण सुरू असल्याने माझा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.


माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला गेला.माझी, कुटुंबियांची बदनामी थांबवा, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.चौकशीतून सत्य समोर येईल मला आज काही बोलायचं नाही, असं देखील यावेळी ते म्हणाले.यापुढेही पूर्वीसारखं काम सुरूच राहणार, मी माझ्या मुंबईच्या घरातून काम करतंच होतं.राजकारण चुकीचं आणि निराधारा असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले.राठोड यांनी हात जोडून विनंती केली आहे की, माझी बदनामी थांबवा.

माझा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न: वनमंत्री संजय राठोड
पोलिसांचा तपास सुरू आहे. सत्य लवकरच स्पष्ट होईल.गेली १० दिवसापासून मी मुंबईत होतो, तेथून काम सुरु होतं, माझं कुटूंब सांभाळत होतो.माझं आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न रचल्या गेला आहे.पुजा चव्हाण मृत्यूचं राजकारण हे घाणेरडं आणि चुकीचं व निराधार असून मला एका घटनेमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका माझं आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.चौकशीतून सत्य समोर येईल आता काहीही बोलायचं नाही.असे सांगून वनमंत्री संजय राठोड यांनी पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचं सर्वांना दु:ख, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.असल्याचे देखील सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad