जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील ८३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉझिटिव्ह आलेल्या २४६ जणांमध्ये पुरुष १५४ आणि महिला ९२ आहेत. यात यवतमाळ १३२ रुग्ण, दिग्रस ३९, पुसद २५, दारव्हा १७, पांढरकवडा १७, नेर ५, वणी ४, आर्णी ३, बाभुळगाव ३ आणि महागाव येथील १ रुग्ण आहे.
एकूण १३३९ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २४६ जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर १०९३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११३८ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १६५०१ झाली आहे. गेल्या चोवीस तासात १५८ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १४९१३ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४५० मृत्युची नोंद आहे.
