Breaking

Post Top Ad

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

'जिल्ह्यात लाॅकडाऊन या दिवसांपासून'

'जिल्ह्यात लाॅकडाऊन या दिवसांपासून'
यवतमाळ: जिल्ह्यात गेल्या दहा दिवसा पासून कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.त्या अनुषंगाने दि.२३ फेब्रुवारी रोजी या बाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सुद्धा घेतली.मात्र लाॅकडाऊन कधी पासून सुरू होणार हे जाहीर करण्यात आलेलं नाही.


जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली लस

'जिल्ह्यात लाॅकडाऊन या दिवसांपासून'
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दि.२४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता दरम्यान कोविड मधील लसीकरण सेंटर मध्ये जावून कोविडची लस घेतली. जिल्हाधिकारी सिंह हे जिवाची पर्वा न करता नागरिकांसाठी कोरोनाच्या संकटात नागरिकांमध्ये जाऊन कोरोना बाबत जनजागृती करताय,त्यामुळे कोरोनाची लस त्यांनी आधीच घ्यायला हवी होती अशी चर्चा लस घेतल्या नंतर सुरू होती.


महाराष्ट्र24 ने या बाबत माहिती घेतली असता लाॅकडाऊन ची पुर्ण तयारी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली असून फक्त आदेश देण्याचे बाकी आहे.जिल्ह्यात लाॅकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी सिंह यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी गुरूवार ला तातडीची बैठक बोलावली असून जिल्ह्यातील १६ ही तालुक्यातील आढावा या बैठकीत घेतल्या जाणार आहे.तद्नंतर लाॅकडाऊन चा आदेश काढल्या जाणार असल्याची माहिती आहे.


जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन दि.२६ फेब्रुवारी रोज शुक्रवारी रात्री पासून जिल्ह्यात लाॅकडाऊन लागु करण्यात येणार आहे.लाॅकडाऊन ची कालावधी दि.२६ फेब्रुवारी ते दि.७ मार्च पर्यंत असेल.या दरम्यान लग्न समारंभ कार्यास केवळ २५ लोकांना परवानगी देण्यात येणार असून हाॅटेल व्यवसायिकांना ग्राहकांना होम डिल्हेवारी देत येणार आहे.लाॅकडाऊन संदर्भात गुरूवारी अधिकृत माहिती जिल्हा प्रशासन जाहीर करण्याची दाट शक्यता असल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad