Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची लक्ष चार टप्यात

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची लक्ष चार टप्यात
यवतमाळ : गत संपूर्ण वर्ष हे जागतिक संकट म्हणुन आलेल्या कोरोनाविरुध्द लढण्यात गेले. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी व सामाजिक संघटनांनी अतिशय उत्तम कामगिरी केली. मात्र अजूनही कोरोनाचा धोका टळला नाही. दिलासादायक बाब एवढीच की, आता कोव्हीड संदर्भात लस उपलब्ध होत आहे. येत्या काही दिवसात कोव्हीड लसीकरण मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात होणार असून जिल्ह्यात चार टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.


जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील नागरी आरोग्य केंद्र क्रमांक १ येथे आयोजित ‘ड्रायरन’ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. नवीन वर्षात नवीन संकल्पना घेऊन लसीकरणाची ही मोहीम राबविण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी सिंह म्हणाले प्रत्यक्ष लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर जसे की, पोलिस, अग्नीशमन दल, महसूल यंत्रणा आदी विभाग, तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील पूर्वव्याधींग्रस्त नागरिक आणि चवथ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या काळात सर्वांनी अतिशय उत्तम काम केले आहे. प्रत्यक्ष लसीकरणासाठी जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून सर्व जण एक टीमवर्क म्हणून काम करणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची लक्ष चार टप्यात

शासनाच्या निर्देशानुसार ही मोहिम राबविण्यात येईल. यासाठी जिल्ह्यात उपविभागीय तसेच तालुका स्तरावर संपूर्ण सुरक्षेचे पालन व पारदर्शक अंमलबजावणीसंदर्भात बैठका घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनीसुध्दा शासन आणि प्रशासनाकडून देण्यात येणा-या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. सोशल मिडीया किंवा इतर माध्यमातून पसरविण्यात येणा-या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले, आरोग्य विभागाने ‘ड्रायरन’ चे चांगले नियोजन केले आहे. कोरोनामध्ये आरोग्य विभाग सुरवातीपासून फ्रंटलाईनवर काम करीत आहे. जिल्ह्यात लसीकरण साठा केंद्र त्वरीत सुरू करण्यात येणार असून या लसीबद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ म्हणाले, आपण गत मार्चपासून ‘एक युध्द कोरोनाविरुध्द’ लढत आहोत. लसीकरणाच्या माध्यमातून आपण या युध्दाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचलो असलो तरी नागरिकांनी अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे. या मोहिमेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पोलिस विभागाने घेतली आहे, असे ते म्हणाले.

कशा राहील नियोजन

कोविड लसीकरण पूर्व तयारी व नियोजन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात एकूण 3 संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालय, तसेच यवतमाळ शहरातील नगरी आरोग्य  केंद्र क्रमांक १ या संस्थांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचा-यांसाठी ११० सार्वजनिक आरोग्य संस्था व २०५ खाजगी आरोग्य संस्था यांची निवड करण्यात आली आहे. या दरम्यान एकूण  १४९६७ अधिकारी व कर्मचा-यांची यादी Co WIN App  वर ऑनलाईन करण्यात आली. लसीकरण करीता स्वतंत्र पथक निर्माण करण्यात येणार आहे. एका पथकात 5 लोकांचा समावेश राहील. कोविड लसीकरणकरीता प्रोटोकॉलप्रमाणे प्रतिक्षालय (Waiting Room), लसीकरण कक्ष (Vaccination Room) व निरीक्षण कक्षाची (Observation Room) निर्मिती करण्यात आली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कांबळे म्हणाले, आपण कोरोनाच्या लसीची आतुरतेने वाट बघत होतो. मात्र असे असले तरी नागरिकांनी निष्काळजीपणे वागू नये. गत काही दिवसांपासून नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा या त्रिसुत्रीचा नागरिकांनी अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वारे म्हणाल्या, आज जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘ड्रायरन’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येक केंद्रावर २५ असे एकूण ७५ लाभार्थ्यांना मॅसेज करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरणाची मॉकड्रीलच नाही तर प्रत्यक्ष लसीकरण सुध्दा सर्वांच्या समन्वयातून उत्तमप्रकारे करू, अशी ग्वाही डॉ. वारे यांनी दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार म्हणाले, जिल्ह्यात लसीकरणासाठी अतिशय चांगली साखळी तयार असून पूर्णपणे खबरदारी घेऊन ही मोहीम यशस्वी करू. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वारे यांनी लसीकरणाची एक लाभार्थी म्हणून स्वत:वर प्रात्यक्षिक केले. सुरवातीला लसीकरणाचा मॅसेज चेक करण्यात आला. त्यानंतर थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमीटरने तपासणी झाल्यानंतर लसीकरण प्रतिक्षा कक्षात भेट, त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण कक्षात प्रवेश आणि इंजेक्शनचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर निरीक्षण कक्ष, असा प्रवास डॉ. वारे यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad