यवतमाळ: जिल्ह्यातील उपविभागीय आणि तालुका स्तरावरील महसूल विभागाच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही.परिनामी महसुल विभागातील कर्मचाऱ्यांना बॅक,पतसंस्था,विमा आणि इतर आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्या अनुषंगाने दि. ८ जानेवारी रोजी यवतमाळ जिल्हा महसुल कर्मचारी संघटना आणि कास्ट्ररईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा यवतमाळ यांच्या वतीने देखील जिल्हाधिकारी सिंह यांना निवेदन देण्यात आले.
कास्ट्ररईब आणि यवतमाळ जिल्हा महसुल कर्मचारी या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी गांभीर्याने दखल घेत विभागीय आयुक्त यांच्या कडे पाठपुरवा करून उपविभागीय आणि तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना वेतन नियमीत देण्यासंदर्भात ताबडतोब पाठपुरवा केल्याने महसुल विभागातील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा लवकरच प्रश्न मार्गी लागणार आहे.
"माणसाच्या जंगलातील 'सिंह'ची माया वेगळीच"
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह हे आत्महत्याग्रस्त जिल्हाचा पदभार हाती घेतल्या पासून विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावला.काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी मोठा कारस्थान देखील रचला होता.मात्र जिल्हाधिकारी सिंह यांच्या वर प्रेम करणाऱ्या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. जिल्हाधिकारी सिंह यांना काही वेळा आधी महसूल विभागातील संघटनेचे पदाधिकारी विविध मागणी संदर्भात निवेदन देता आणि जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह हे तेवढ्याच गांभीऱ्यांने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचे पाठपुरवा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताय खरच जिल्हाधिकारी हे माणसाच्या जंगलातील 'सिंह' म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही.
दरम्यान जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट नमनुद केले आहे.की, महसूल विभागातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांचे मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर वेतन मिळालेले नाही,त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरीत त्यांना अदा करण्याची विनंती जिल्हाधिकारी सिंह यांनी केली आहे. विशेष म्हणजे लेखाशिर्ष निहाय आहरण व संवितरण प्रणालीवर वेतना करिता लागणारे अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी विभागीय आयुक्त यांच्या कडे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी दि.८ जानेवारी ला उशीरा केली आहे.
महाराष्ट्र24 वेब पोर्टल चा ऑनड्राव्ह अॅप करिता खालील लिंग ला टच करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra24