भंडारा: भंडारा जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता केअर युनिटमध्ये आग लागल्याने त्यात तब्बल १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारीच्या मध्ये रात्री दरम्यान घडली.सामान्य जिल्हा रूग्णालयात अचानक रात्री दोन च्या सुमारास लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला असून ७ नवजात बालकांना वाचवण्यात यश आले आहे.दवाखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने एकच खळबळ उडाली होती.दरम्यान आऊट बोर्ण युनिट मधून धूर निघत असल्याचे पाहून जोरजोरात आरडाओरडा सुरू झाले.तद्नंतर दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केले.मात्र त्यात १० नवजात बालकांचा मृत्यू झाला.


