Breaking

Post Top Ad

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक
यवतमाळ : गुरूवारी दिवसभरात जिल्ह्यात ५९ जण नव्याने पॉझेटिव्ह आल्याने कोरोनाने पुन्हा उद्रेक केल्याचे दिसून येत आहे. स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ५२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण ५०४ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५९ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ४४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४०१ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १३८११ झाली आहे. गुरूवारी ५२ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १२९८८ एवढी आहे. तर जिल्ह्यात एकूण  ४२२ मृत्युची नोंद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad