यवतमाळ जिल्ह्यात सध्या कोरोना चे रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून येत आहे.त्यातच आज दि.१८ जानेवारी रोजी ९२५ ग्रामपंचायत करिता मतमोजणी होणार आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदी लागु करण्यात आल्याने वियजी मिरवणूक काढता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी कोरोना चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना करित आहे.त्यातच सोमवारी जिल्ह्यात ९२५ ग्रामपंचायत करिता मतमोजणी पार पडणार आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यात कलम १४४ लागू केल्याने चार पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही,त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये वियजी झालेल्या पॅनल ला विजयी मिरवणूक काढता येणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. कायदा मोडल्यास त्यांचे गंभीर परिनामाला पुढे जावावे लागतील अशा इशारा पोलीस प्रशासना कडून देण्यात आला आहे.