यवतमाळ: जिल्ह्यात नुकताच १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत करिता मतदान झाला.उद्या म्हणजेच १८ जानेवारी रोज सोमवार ला दुपार पर्यंत निकाल लागणार आहे.गेल्या दोन तीन दिवसा पासून कोणाचे किती उमेदवार निवडून येणार यांची सर्वत्र गावात चर्चा होत आहे.परंतू कोणाचा पॅनल येणार अथवा येणार नाही हे काही तासातच स्पष्ट होणार आहे.
निवडणूका म्हटल्या की,भव्य मिरवणूक आलीच.त्यामुळे वियजी पॅनल चे उमेदवार मिरवणूक काढणार हे जवळपास नक्कीच आहे.मात्र आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही गावात मिरवणूकी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या 'गुलाल' मध्ये तिखट पावडर टाकून बदला घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून पोलीसांना मिळाली आहे.त्या अनुषंगाने ठाणेदार पितांबर जाधव यांनी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायत पैकी एकाही गावात विजयी मिरवणूक काढू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा गावपुढाऱ्यांना पोलीसांनी दिला आहे.