Breaking

Post Top Ad

रविवार, २४ जानेवारी, २०२१

'रेती माफियांनो सावधान'

'रेती माफियांनो सावधान'
यवतमाळ: उमरखेड येथील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या वर रेती माफियांनी जीवघेणा हल्ला केल्या नंतर महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची जिल्हा प्रशासना कडून दखल घेण्यात आली असून रेती माफियांवर कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने हलचाली सुरू आहे.


'रेती माफियांनो सावधान'


जिल्हाधिकाऱ्यांची घटनेकडे नजर

नायब तहसीलदार यांच्या वर चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्या नंतर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी रेती माफियांना वाटणी वर आणण्यासाठी हलचाली सुरू केल्याची माहिती आहे.सदर घटनेतील नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या वर हल्ला झाल्या नंतर जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती आहे.यापुढे रेती माफिया तस्करी करतांना आढळल्यास कायद्याने जशाचा तशा उत्तर देऊन कडक कारवाई करण्याचे सुचना देखील जिल्हाधिकारी यांनी केल्याची चर्चा महसुल विभागात सुरू आहे.त्यामुळे यापुढे रेतीची तस्करी करताना रेती माफियांनो सावधान रहा.जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे वाळूतस्करीवर लक्ष आहे. त्यामुळेच यंदा वाळूतस्करीचे सर्वाधिक एफआयआर दाखल झाले आहे. शिवाय सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. 


उमरखेड-ढाणकी रस्त्यावर गोपिकाबाई विद्यालय जवळ रेतीची तस्करी करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू होती.त्या दरम्यान अचानक एका रेती माफियाने नायब तहसीलदार वैभव पवार यांच्या पोटात चाकू खुपसून सदर आरोपी घटनास्थळा वरून पळ काढला.या घटनेत नायब तहसीलदार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad