Breaking

Post Top Ad

बुधवार, २ डिसेंबर, २०२०

पांढरकवडा जवळ अपघातात दोन ठार

पांढरकवडा जवळ अपघातात दोन ठार
पांढरकवडा(यवतमाळ) दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी येथे कशिष हाॅटेल जवळ उभ्या टिपर ला ट्रॅव्हलने जोरदार धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना सकाळी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर घडली.

राष्ट्रीय महामार्गावर उभा असलेल्या टिपर क्रमांक एम.एच.४० एन.०२५९ याला भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल क्रमांक यू.पी.८३ बी.टी.७८३१ याने जोरदार धडक दिली.त्यामुळे अपघातात दोन जण ठार झाले.विशेष म्हणजे नेपाळ-भारत सिमेवरून कृष्णा नगर चेन्नई ला जाणाऱ्या ट्रॅव्हल मध्ये एकुण ८० प्रवाशी प्रवास करित होते.दरम्यान झालेल्या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जण उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या अपघातात अन्य चौघे जण गंभीर असल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad