अमरावती विभागात असे झाले मतदान
जिल्ह्यात एकूण ५६४९ पुरुष मतदार तर १८१० महिला मतदार असे एकूण ७४५९ मतदार आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या ४२ आहे. यात ३२ पुरुष मतदार आणि १० महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ३९७७ पुरुषांनी आणि १२६९ महिला मतदारांनी निवडणुकीचा हक्क बजावला. तर दिव्यांग मतदारांमध्ये ३२ पुरुषांपैकी २७ आणि १० महिलांपैकी ६ महिला मतदारांनी मतदान केले.
यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून ही निवडणूक होत आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे. तत्पूर्वी निवडणूक निरीक्षक आनंद लिमये आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी बचत भवन येथील तसेच तहसील कार्यालयातील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

