जुन्या वादातून दोन गटात राडा

जुन्या वादातून दोन गटात राडा
आर्णी(यवतमाळ) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जुन्या वादातून दोन गटात राडा झाल्याची घटना दुपारी दरम्यान तीन वाजता घडली. मागील शनिवारी आर्णी आणि जवळा येथील दोन व्यापाऱ्या मध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता.

मंगळवारी दुपारी दरम्यान जवळा येथील वीस ते पंचवीस लोकांचा जमावाने अचानक बाजार समिती मध्ये धडक दिली आणि आर्णी येथील एका व्यापाऱ्या वर थेट राडा केला.त्यामुळे काही वेळेसाठी बाजार समिती गोंधळ उडाला होता. उशीरा पर्यंत तडजोड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पोलिसात हा प्रकरण न पोहचल्याने फिर्याद दाखल करण्यात आली नाही.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने