यवतमाळ येथे शिवसेनेचे खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चा मध्ये हजारो शेतकरी वर्ग देखील उपस्थितीत होते.दरम्यान शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी पिक विमा अधिकाऱ्यांसोबत झटापटी केल्याने चांगलेच वातावरण तापले होते.खासदार भावना गवळी यांनी शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी या एकमेव मागणी साठी यवतमाळ मध्ये भव्य मोर्चा काढला.हा मोर्चा पिक विमा कार्यालयात धडकला.यावेळी खासदार भावना गवळी,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार सह आदी शिवसेना पदाधिकारी जाब विचारण्यासाठी कार्यालयात गेले असता अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतोष ढवळे यांनी अधिकाऱ्यांसोबत झटापटी केली.

