यवतमाळ: आर्णी येथील बुधवार पेठ म्हणजे 'प्रेमनगर' याच प्रेमनगर मध्ये महिला आणि मुलीला जबाबदारीने ईच्छेविरुद्ध जाऊन स्वतःला देहविक्री करावी लागत होती.मात्र आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव आणि प्रभारी मुख्याधिकारी उदय तुंडलवार यांच्या संयुक्त मोहीम राबवून प्रेमनगर मधील अतिक्रमण काढण्याची धडक कारवाई करण्यात आली.
तो शाह'ण्या' गेला कुठे?
तीन वर्षा आधी संपुर्ण शहरातील अतिक्रमण काढत असताना त्यात प्रेमनगर चा देखील समावेश होता.मात्र एका शाह'ण्या' नगरसेवकांने राजकीय दबाव आणुन अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याने कारवाई झाली नव्हती.मात्र सोमवारी संपुर्ण प्रेमनगर हटवल्याने तो शाह'ण्या'नगरसेवक गेला कुठे अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.
गेल्या कित्येक वर्षा पासून देहविक्री सह अवैध धंद्याचा एकमेव ठिकाण म्हणजे प्रेमनगर,याच जागी देहविक्री सह जुगार,मटका आणि गुन्हेगारी जगात नविन मुलांना जन्म दिल्या जात होतं.मात्र आर्णी शहराच्या इतिहासात पहिल्यांच पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करून संपुर्ण प्रेमनगर मधील अतिक्रमण काढण्यात आल्याने प्रशासनाचे कौतुक होत आहे.

