आर्णी(यवतमाळ) येथे सोमवार पासून देहविक्री करिता प्रसिद्ध असलेल्या प्रेमनगर मधील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलीस प्रशासनाने धडक पध्दतीने हाती घेऊन अतिक्रमण काढले.मंगळवारी सुद्धा अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरूच होती.त्या अनुषंगाने एका अती शाह'ण्या' नगरसेवकाने काही लोकांचे अतिक्रमण हटवू नये यासाठी अनेकांना फोन करून विनंती केली. मात्र विनंतीला भीक घालण्यात न आल्याने काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याला रिकाम्या हातीच परत यावे लागलं.
प्रेमनगर या रेड एरियात गरिब लोकांना लूटण्याचे 'पाप' दररोज तिथे सुरू होते.मात्र त्या ठिकाणी गुन्हेगारांना सहारा दिल्या जाते परिनामी पोलीसांना अडथळा निर्माण होत असल्याने संपुर्ण प्रेमनगर हटवण्याची जणू काही शपथच पोलीस,महसुल आणि पालिका प्रशासनाने घेतल्याने काही 'भाई' लोकांना नाईलाजाने आपली दुकाने हटविण्याची वेळ आली. त्यामुळे एक भाई,दुसऱ्या भाई ला वाचविण्यासाठी आमदाराला फोन करून अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबविण्याची विनंती केली.मात्र आमदारांने त्या शाह'ण्या' ला कवडीची ही किंमत दिली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शहरात प्रथमच चांगलं काम होत आहे.त्यात स्वतः हातभार लावण्या एवजी काड्या करण्याचं पाप सध्या अती शाह'ण्या' लोकांकडून होत असल्याची ओरड सुरू आहे.
