Breaking

Post Top Ad

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

अन् महिलेने लावला पोटाला चाकू

अन् महिलेने लावला पोटाला चाकू
उमरखेडयेथे महिलेने स्वतःच्या हाताने स्वतःला चाकू लावल्याची घटना दुपारी दरम्यान घडली. खंड एक हद्दीत ई क्लास जमिनीवर राहुटी ठोकून ४ एकर टेकडीच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्या महिलेनी चक्क स्वतःच्या पोटाला चाकू लावल्याने अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महसूल व पोलिस पथकाला  हतबल होवुन रिकाम्या हाताने परतावे लागल्याची घटना रविवारी दरम्यान स्थानिक महागाव रस्त्यावरील बायपास जवळील टेकडीजवळ घडली.


अतिक्रमण हे ४ एकरच्या एका बाजूला अतिक्रमण एक राहूटी तर दुसऱ्या टोकाला देखील राहूटी टाकुन करण्यात आले आहे परंतू अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या पथकाला केवळ पथकात सक्षम अधिकारी कुणीही नसल्यामुळे महिलांना घाबरुनच परत परतावे लागले. या घडलेल्या प्रकारामुळे मात्र शहरात विविध चर्चेला पेव फुटले आहे.

 

मागील ४ दिवसांपासून महागांव रोडच्या अंदाजे चार एकर टेकडीच्या शासकीय जमिनीवर राहुट्या ठोकून चुरमुरा येथील सात आठ महिलांनी अतिक्रमण केल्याची माहिती तलाठ्यांना मिळताच तलाठी ठाकरे व दत्तात्रय दुर्केवार हे महिला पोलीसांसह तगड्या पोलीस बंदोबस्तात घटनास्थळी पोहचले परंतू सक्षम पोलीस अधिकारी व महसुल अधिकारी मात्र तेथे कोणीही तेथे हजर नव्हते पोलीस ताफा जवळ येताच महिलांनी आक्रमक भूमिका घेतली त्यातील एका महिलेने स्वत:च्या पोटाला चाकू लावला तेव्हा पोलीस व तलाठ्यांची भंबेरी उडाली व कार्यवाही न करताच पोलीस व तलाठी रिकाम्या हाताने परतले. हा थरार पाहण्यासाठी अनेकांनी केली होती.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad