Breaking

Post Top Ad

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

रेती तस्करी करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात


रेती तस्करी करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात
दारव्हा(यवतमाळ) तालुक्यातील बोरी अरब हे गाव अडान नदीच्या काठावर वसलेला मोठ गाव त्यामुळे परिसरात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होते.त्यातच अवैध रेती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रकला पांढूर्णा-मोरगव्हाण जवळील पारवेकर टर्निंग पाॅईट जवळ भीषण अपघात झाला.या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी आणि गुरूवार च्या रात्री दरम्यान घडली.

अवैध रेती घेऊन दारव्हा कडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.०४ सी.यू.३०८३ हा भरधाव वेगात असल्याने वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून अनेक जण यात जखमी झाले आहे.विशेष म्हणजे पलटी झालेल्या रेतीच्या ट्रक मध्ये अनेक जण दबून असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


ज्या ठिकाणी अवैध रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला.त्याच वळणावर दिवंगत आमदार निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले होते.त्यामुळे हा वळण धोकादायक मानल्या जाते.दरम्यान लाडखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक कारेगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी जावून तपास सुरू केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad