Breaking

Post Top Ad

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

युवा उद्योजक विश्वजीत राठोड कडून जिल्हाधिकारी सिंह यांचा सत्कार

युवा उद्योजक विश्वजीत राठोड कडून जिल्हाधिकारी सिंह यांचा सत्कार
यवतमाळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात 'मिशन उभारी' या सारखी सकारात्मक संकल्पना जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी हाती घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम राबवत असल्या बदल जिल्हाधिकारी सिंह यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन युवा उद्योजक विश्वजीत राठोड यांनी सत्कार केला.

आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन यवतमाळ जिल्हा कडे पाहील्या जाते.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी 'मिशन उभारी' उपक्रम राबवित आहे.सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांमध्ये जगण्याची नवी उमेद जागवून त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे करण्याची संकल्पना जिल्हाधिकारी सिंह राबवत असल्याने बोरगांव येथील युवा उद्योजक विश्वजीत राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी सिंह यांचा सत्कार केला.

दरम्यान जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांसाठी सुरू केलेल्या 'मिशन उभारी' या उपक्रमाचा कौतुक करित "प्रशासनाला शेतकऱ्यांसाठी जी मदत माझ्या कडून लागेल ते मी करायला तयार असेल" अशी भावना युवा उद्योजक विश्वजीत राठोड यांनी जिल्हाधिकारी सिंह यांच्या समोर व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी 'मिशन उभारी' उपक्रमाला लोकसहभाग मिळल्यास नक्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चित्र बदलायला वेळ लागणार नाही असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad