तणावात जगणाऱ्या भूमिपुत्रांचे अश्रूं पुसतोय सिंह
यवतमाळ: यावर्षी सोयाबीनचा पिक करपून गेला.लगेच पांढऱ्या सोन्यावर किंबहुना कापसावर बोंडअळीचा संकट आल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.या आधीच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणुन जगात आपलं तोंड काळ करणाऱ्या यवतमाळ जिल्हात शेतकऱ्यांच्या अश्रूंना पुसण्याचा काम जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह 'मिशन उभारी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. यवतमाळ जिल्हा निर्मिती पासून अशा जिल्हाधिकारी किंबहुना माणसांच्या जंगलातील 'सिंह' आज पर्यंत जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी पाहीला नाही.राज्यापुढे नवा आदर्श जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह 'मिशन उभारी'च्या माध्यमातून ठेवला आहे.
मिशन उभारी राबवून आत्महत्याग्रस्त कुटूंबातील सदस्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना शासनाच्या विविध विभागा मध्ये सुरू असलेल्या योजनांचा लाभ देवून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंह यांचा प्रयत्न आहे.त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्ह्यात 'मिशन उभारी' सारखा कार्यक्रम हाती घेतला आहे.
गेल्या काही महिन्यापासून कोरोनाशी रात्रंदिवस एक करून प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यात जिल्हाधिकारी सिंह यांनी यशस्वीरित्या प्रयत्न केला आणि त्याला यश देखील आहे.याच दरम्यान काही लोकांनी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना बदनाम करण्याच्या दृष्टीने कट देखील रचल्या गेला होता.
आत्महत्या रोखण्यासाठी समिती
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्याग्रस्त गावात 'बळीराजा' समिती गठीत करण्यात येणार असून या समितीत सरपंच अध्यक्ष,पोलीस पाटील सचिव आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हे सदस्य राहणार आहे.या मध्ये तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहायक,अंगणवाडी सेविका,आशा वर्क,प्रतिष्ठित नागरिक यांना बळीराजा समिती मध्ये सहभाग राहणार आहे.
समितीचे काय काम करणार ?
बळीराजा समिती मार्फत गावातील ताणावग्रस्त शेतकरी कुटूंबाला शोधून त्यांची माहिती संबधित तहसीलदार यांना सादर करतील.तद्नंतर तालुकास्तरीय समितीच्या मार्गदर्शनात प्रशासन राबवित असलेल्या 'मिशन उभारी' च्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागामध्ये सुरू असलेल्या योजनांचा लाभ ताणावग्रस्त शेतकरी कुटूंबाला देऊन समुपदेशन करून त्या सदर कुटूंबातील सर्व सदस्यांना ताणाव मुक्त करण्याचा काम केल्या जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना
जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही,याची दक्षता घेण्यात येणार असून दरमहा सर्व शेतकऱ्यांना धान्य मिळते किंवा नाही याची खात्री केली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आरोग्य शिबीर
शेतकरी हा कायम आरोग्या कडे दुर्लक्ष करून संसाराचा गाडा चालवतो.त्या अनुषंगाने आजारग्रस्त शेतकऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.त्यामुळे दर महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्रावर गावनिहाय शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.दुर्धर आजारग्रस्त शेतकरी आढळल्यास त्यांना जिल्हास्तरावरील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार देण्यात येणार आहे.
मागेल त्याला विहिर व शेततळे
शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई सुविधा करण्यासाठी मग्रारोहयो अंतर्गत मागेल त्याला विहिर व शेततळ्याची योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.कृषी विभागामार्फत जलसिंनाची साधने सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मिशन उभारी या कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विज जोडणी,कृषी पंप,सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन,प्रत्येक गावाकरिता अधिकारी,कर्मचारी हे आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेणार असून आत्महत्या मुक्त गाव अधिकारी आणि कर्मचारी करणार आहे.तसेच पशुसंवर्धन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून ग्राणस्तरीत समितीने गांवकऱ्यांशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या पशुधनाला लागणाऱ्या चारा आणि पशुधन विभागा अंतर्गत वैरण विकास योजना करिता अनुदान तत्वावर बियाणे वाटपाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या संकल्पेतून हाती घेतलेल्या मिशन उभारी या कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या मुलां-मुली करिता रोजगारभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.विशेष म्हणजे शिर्षकान्वये सुशिक्षित बेरोजगार युवकांना गृह उद्योग,व्यवसायाची उभारणी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून शेतकऱ्यांना पिक कर्ज व पिक कर्जाचे पुनर्गठन करणे,शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये अधिकाधिक शिथीलता आणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे.


