Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

"अंगावर यायल तर शिंगावर घेण्याची तयारी":उद्धव ठाकरे

"अंगावर यायल तर शिंगावर घेण्याची तयारी":उद्धव ठाकरे
मी राज्याचा 'मुख्यमंत्री' आहे.त्यामुळे शांत आहे मात्र याचा अर्थ मी नामर्द नाही आणि ज्या प्रकारे आमच्या लोकांच्या कुटूंबीयांवर हल्ले सुरू आहे ही पद्धत किमान महाराष्ट्राची नाही.परंतू तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर,अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्याची आमची तयारी असल्याचा खणखणीत इशारा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखातीतून दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 'अभिनंदन मुलाखात' दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली.त्या दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या फक्त हात धुतोय; जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन.अनेकांना सध्या डोक्याचे विकार झालेत.त्यांच्या वर उपचार करावे लागणार असल्याचा टोला विरोधी पक्षाचे नाव न घेता केली आहे.


राज्यात ईडी, सीबीआयची भीती दाखवण्याचा काम केल्या जात आहे. मात्र आम्ही कोणत्याही ईडी, सीबीआय घाबरणारे नाही.सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा,आम्ही दहा सूड काढू अशा ठाकरे शैलीत इशारा मुलालाखातीतून देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखाती नंतर राज्यात राजकारण तपाणार असल्याची शक्यता अधिक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad