यवतमाळ : गेल्या काही दिवसा पासून कोरोना रूग्णांची संख्या घटली असताना तीन दिवसा पासून पुन्हा पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंग,तोंडाला मास्क आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे.
गुरूवारी गेल्या २४ तासात जिल्ह्यात ९५ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये दारव्हा तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ७३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.