Breaking

Post Top Ad

रविवार, १ नोव्हेंबर, २०२०

अजित : "हिरो टू व्हिलन"

अजित : "हिरो टू व्हिलन"
हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या असामान्य भुमिकांनी ज्या खलनायकांनी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान केले आहे त्यात प्राण, प्रेमनाथ, प्रेम चोपडा, जीवन रणजीत,अमजद खान, सुजीत कुमार,अमरीश पुरी यांच्या बरोबरच 'किंग ऑफ व्हिलन' अशी  ओळख असणाऱ्या आणि ज्याचा "मोना डार्लिंग" हा डायलॉग आजही जुन्या नव्या प्रेक्षकांच्या तोंडावर आहे त्या अजित ची गोष्ट मात्र काही औरच म्हटली पाहिजे.नुकताच म्हणजे २२आक्टोबरला अजित चा स्मृतीदिन साजरा झाला,त्या निमित्त हा लेखन प्रपंच.

अमरावतीला शिवाजी आणि विदर्भ महाविद्यालयात शिकत असताना माझे मित्र वल्लभदास राठी, त्यावेळी त्यांचे बंधू भोजराजजी राठी अडत्या चे काम करायचे, सोबत दर रविवारी न चुकता सिनेमा पहायला जात असे. मनोरंजनाचे दुसरे कोणतेच साधन नव्हते. वल्लभदास राठी  हेच माझे सुद्धा सिनेमाचे तिकीट काढायचे. त्यामुळे चित्रा,प्रभात, वसंत राजकमल या सर्व चित्रपटगृहात आम्ही असंख्य सिनेमे पहिले. प्राण,प्रेमनाथ,प्रेम चोपडा,जीवन, रणजीत,अमजद खान, सुजीत कुमार ,अमरीश पुरी, अजित ई. खलनायक असलेले चित्रपट मला फार आवडायचे. त्यामुळेच यादव की बारात, सुरज,जुगनू,मिलन, मुगले आजम, कालीचरण, मिस्टर नटवरलाल, बेकसूर, असे अनेक चित्रपट मला पहायला मिळाले. अमिताभ बच्चनचा जंजीर हा चित्रपट तर चार-पाच वेळा पहिला. 

प्रा.न. मा. जोशी - ८८०५९४८९५१

जावेद अख्तर यांच्या जंजीर चित्रपटात सुपर हिरो अभिताभ बच्चन आणि सुपर खलनायक प्राण यांच्या मध्ये खलनायक अजित या त्रिकुटाने केलेली जबरदस्त भूमिका आजही स्मृतीपटलावर जशी च्या तशी कोरलेली आहे. राजेंद्र कुमार यांच्या सुरज चित्रपटात खलनायकाची भूमिका प्रेम नातला दिली होती मात्र ने त्यांनीच सुचविल्यामुळे मी का अजित ला मिळाली राजेंद्रकुमार यांनीच  खलनायकाची भुमिका करण्याचे सुचवले होते.त्याने काही चित्रपटात नायकाची भूमिका केली होती ,त्या यशस्वी झाल्या नव्हत्या. २७ जानेवारी १९२२ ला हैदराबाद जवळील गोलकुंडा येथे 'बशीर खान'च्या पोटी जन्मलेल्या अजित चे मूळ नाव हमीद अली खान असे होते. ख्यातनाम चित्रपट निर्देशक महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट यांनी हे नाव बदलून अजित असे ठेवले . उत्तम शरीरसौष्ठव, गौरवर्ण, भारदस्त दमदार आवाज यामुळे चित्रपटात हिरो होण्याच्या अपेक्षेने हमीद अली खान ने १९४० साली अभ्यासाची पुस्तके विकून हैदराबाद वरून मुंबई गाठली. 

मुंबईत सिमेंटच्या  गोल पाईप मध्ये त्याचे राहणे असे. या पाइपची खंडणी मागणाऱ्या दोन गुंडांना त्याने झोडपून काढले होते आणि तेव्हाच तो वास्तविक जीवनातला खलनायक झाला होता. शाह मिर्झा या चित्रपटात १९४६ मध्ये त्याने पहिली भूमिका केली. सिकंदर, आप बिती, नास्तिक, मिलन, बडा भाई, ढोलक हातिम ताई, सोने की चिडिया आदी चित्रपटात त्याने भूमिका केल्या. मुगले आजम आणि नया दौर चित्रपटात त्याला संधी मिळाली. नलिनी जयवंत त्यासोबत भूमिका असलेले त्याचे बरेच चित्रपट आहेत. त्याच्या करियरला वाव मिळाला तो १९६६ मध्ये आलेल्या राजेंद्रकुमार च्या सुरज या चित्रपटापासून. पुढे प्रकाश मेहता च्या गाजलेल्या आणि अभिताभ बच्चन नायक असलेल्या जंजीर पटात त्याची भूमिका फारच गाजली. यादो की बारात ,कालीचरण मिस्टर नटवरलाल , नया दौर, प्रतिज्ञा सारखे सुपरहिट चित्रपट त्याला मिळाले. जवळपास दोनशे चित्रपटात त्याने भूमिका केल्या आहेत.अजित चे नाव आठवले म्हणजे मोना डार्लिंग हा डायलॉग विसरतो म्हटले तरी विसरता येत नाही इतका तो लोकप्रिय झालेला आहे.लिली डोन्ट बी सीलि आणि लायन हाही त्याचा असाच  गाजलेला डायलॉग. अजितने खलनायकांना एक शैली, एक विश्वास आणि एक ओळख  देण्याचे महान कार्य केले आहे.अजित म्हटला म्हणजे सोफिस्तिकॅटेड, एज्युकेटेड, मोठ्या चौकड्याचा टीत सूट, पांढऱ्या लेदरचा शु, काळा चष्मा, शानदार घड्याळ सिगारेट, आणि सुवर्णालंकार असा भरदार रुबाबदार धरम तेजा आपल्यासमोर उभा राहतो. 

चांगल्या नायकाची व खलनायकाची ओळख म्हणजे ज्या नायकाच्या भूमिकेवर ताली म्हणजे टाळी पडते तो उत्तम नायक ,ज्या खलनायकाच्या भूमिकेवर गाली म्हणजे शिव्या पडतात तो उत्तम  खलनायक समजला जातो.अजित हा असा उत्तम खलनायक होता. मुलाने तर म्हटले होते की वडिलांच्या काकाच्या जबरदस्त भूमिकेमुळे लोकांचा याबद्दल गैरसमज असा की मी दारूबाज आणि गुंडागर्दी करणारा मुलगा असेल कारण हा अतिशय वाईट बापाचा मुलगा आहे म्हणून मला अनेक वर्ष कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. मोठ्या मुश्किलीने मिळाली आणि लग्न झाले सेक्सी अजितच्या नायकाचे काम किती सुपर असेल हे समजून येईल . मधुबाला, वनमाला, नलिनी जयवंत या नायिकांचा हिरो होण्याची संधी त्याला मिळाली. पृथ्वीराज कपूर, अभिताभ बच्चन,दिलीप कुमार,धर्मेंद्र,राजेंद्र कुमार, देवानंद यासारख्या महान नायकासोबत काम करून खलनायकीच्या क्षेत्रात आपण 'अजित' आहोत हे त्याने सिद्ध करून दाखवले. अजितचे तीन विवाह झाले होते. तीन मुले आणि दोन मुली आहेत.अजितला वाचनाचा खूप छंद होता. पुस्तकाचा त्याच्याकडे इतका संग्रह की स्वतःची मोठी लायब्ररी तयार झाली. ची गंमत पहा जी पुस्तके विकून मुंबई गाठली त्याच पुस्तकांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. मुंबईहून परत हैदराबादला आल्यावर लायब्ररी झाली होती. महेश भट्ट यांच्या क्रिमिनल चित्रपटातील त्यांची भूमिका शेवटची होती.व्हिलन मे भी कुछ मर्दांनगी होनी चाहिये असे मत असलेल्या अजितचे हैदराबाद येथे वयाच्या ७६ व्या वर्षी २२ ऑक्टोबर १९९८ ला निधन झाले. स्मृतींना विनम्र अभिवादन.

(लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad